Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu
Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu

Wednesday 12 October 2016

ऊर्जा - Energy

उर्जा (Energy) 


  1. एखाद्या पदार्थात असलेली कार्य करण्याची क्षमता म्हणजेच त्या पदार्थाची ऊर्जा होय.
  2. MKS पध्दतीत ऊर्जा ज्युल या एककात मोजतात तरCGS पध्दतीत अर्ग हे ऊर्जेचे एकक होय.
  3. कार्या प्रमाणे ऊर्जा ही सुध्दा अदिश राशी आहे.
  4. निसर्गामध्ये ऊर्जेची यांत्रिक ऊर्जा, रासायनिक ऊर्जा, ऊष्णता ऊर्जा, प्रकाश ऊर्जा, ध्वनी ऊर्जा, आण्विक ऊर्जा इ. विविध रुपे आढळतात.
यांत्रिक उर्जा:
 यांत्रिक ऊर्जा दोन प्रकारात आढळून
येते. गतिज ऊर्जा आणि स्थितिज ऊर्जा
  •  गतिज  ऊर्जा (kineticEnregy): गतिमान अवस्थेमुळे पदार्थात असणा-या ऊर्जेला गतिज ऊर्जा असे म्हणतात.उदा-गतिमान मोटारीचे ब्रेक दाबले असता मोटार थोडी पुढे जाते. हातोड्याच्या साह्याने खिळा ठोकणे.बंदुकीची गोळी गतिज ऊर्जेमुळे दुसऱ्या वस्तुमध्ये घुसत असते. वाहते पाणी इ. वस्तुमान (m)असणारा पदार्थ
  •  स्थितिज ऊर्जा (Potential Energy):एखाद्या संस्थेतील निरनिराळ्या घटकांच्यापरस्पर सापेक्ष स्थितीमुळे व त्या घटकांमधील अन्योन्य क्रियेमुळे त्या संस्थेत जी ऊर्जा सामावलेली असते, तिला त्या संस्थेची स्थितिज ऊर्जा असे म्हणतात. उदा :घड्याळाची गुंडाळलेली स्प्रींगमध्ये स्थितिज ऊर्जा असते.दोरी ताणलेले धनुष्यामध्ये स्थितिज ऊर्जाअसते.बॉम्बमध्ये भरण्यात येणारे स्फोटके मिश्रणात रासायनिक स्थितिज ऊर्जा सामावलेली असते.धरणातील पाण्याच्या प्रचंड साठ्यात स्थितिज ऊर्जा असते. स्थितिज ऊर्जा (P.E.) = mgh
कार्य आणि ऊर्जा यांचा संबंध:
  1. एक वस्तु जेव्हा दुस-या वस्तुवर कार्य करते त्यावेळी कार्य करणा-या वस्तुची ऊर्जाकमी होते. आणि ज्या वस्तुवर कार्य होते त्या वस्तुला तेवढीच ऊर्जा प्राप्त होते. ही ऊर्जा कोणत्याही स्वरुपात असते. जसे धरणातील पाण्याच्या गतिज ऊर्जेचे रुपांतर विद्युत ऊर्जेत केले जाते. (कोयनानगर)
  2. या विद्युत ऊर्जेचे रुपांतर गतिज ऊर्जेत होते. जसेकि विजेवर चालणारी आगगाडी, विजेवर चालणारे पंखे, कारखाण्यातील यंत्रे इत्यादी
  3. विद्युत ऊर्जेचे प्रकाश ऊर्जेत रुपांतर होते. जसेकि विजेचा बल्ब, ट्युबलाईट इत्यादी.
  4. विद्युत ऊर्जेचे उष्णता ऊर्जेत रुपांतर होते. जसेकि विजेचा हिटर, इस्त्री, गिझर इत्यादी.
  5. विद्युत ऊर्जेचे ध्वनी ऊर्जेत रुपांतर होते. जसे कि विद्युत घंटा, रेडिओ इत्यादी.
  6. विद्युत ऊर्जेचे प्रकाश ऊर्जेत रुपांतर होते. जसेकि विद्युत विघटन, विद्युत विलेपन इत्यादी.
  7. औष्णिक विद्युत केंद्रात ऊष्णतेचे रुपांतर विद्युतऊर्जेत केले जाते.
  8. तारापुर येथे आण्विक विद्युत केंद्रात आण्विक ऊर्जेचे विद्युत ऊर्जेत रुपांतर केले जाते.
  9. बॉम्बचा स्फोट होतो तेव्हा त्यामधील रासायनिक ऊर्जेचे उष्णता, प्रकाश, ध्वनी, यामध्ये रुपांतर होते.
                            ऊर्जा अक्षय्यतेचा नियमउर्जेची निर्मिती किंवा नाश होवू शकत नाही. एका प्रकारच्या उर्जेचे दुस-या प्रकारच्या ऊर्जेत रूपांतरकरता येते. तथापि, विश्वामधील एकूण ऊर्जा सदैव अक्षय राहते .