राज्यसेवा पूर्व सराव प्रश्नसंच :
1. सकल प्रजनन/पुनरुत्पादन दर म्हणजे
लग्नापासून स्त्रीने जन्म दिलेली एकूण बालके एका वर्षात जन्मलेली बालके वजा मृत बालके जन्मदर वजा मृत्युदर स्त्रीच्या संपूर्ण जननकाळात जिवंत प्रसूती झालेली नवजात अर्भके
उत्तर : स्त्रीच्या संपूर्ण जननकाळात जिवंत प्रसूती झालेली नवजात अर्भके
2. व्यावसायिक शीतगृहात, लोणी किती तापमानावर ठेवले जाते?
0°से. 20°से. 4°से. -4°से.
उत्तर : 20°से.
3. लेसरच्या सहाय्याने पर्यावरण सनियंत्रण करण्याच्या तंत्राला काय म्हणतात?
रडार सोनार लेडार लिडार
उत्तर : लिडार
4. फळांच्या व भाज्यांचा वितंचकीय तांबूसीकरणास तपकिरीपणास कारणीभूत मुख्य वितंचक कोणते?
पेरोक्सिडेज पॉलिफेनॉल ऑक्सिडेज कॅटॅलेज कोलेस्टेरोल ऑक्सिडेज
उत्तर : पॉलिफेनॉल ऑक्सिडेज
5. सॉलिड फूड पॅकेजिंगसाठी सर्वात अधिक वापरली जाणारी व स्वस्त प्लास्टीक फिल्म कशाची असते?
पोलीएथिलीन पोलिस्टायरीन पोलिप्रोपिलीन पोली व्हीनाईल क्लोराइड
उत्तर : पोलीएथिलीन
6. दुर्बिणसारख्या प्रकाशीय उपकरणातील क्षेत्रभिंग व नेत्रभिंग यांच्या जोडणीतून काय आकारते?
वस्तुभिंग संयुक्त नेत्रभिंग विशालक वरीलपैकी एकही नाही
उत्तर : संयुक्त नेत्रभिंग
7. सन 2006 सालानंतर खालीलपैकी कोणत्या ग्रहाला/सूर्यमालेतील ग्रह मानले जात नाही, परंतु बटुग्रह म्हणून ओळखण्यात येते?
बुध युरेनस नेपच्यून प्लूटो
उत्तर : प्लूटो
8. ऑक्सीश्वसनामध्ये ऑक्सीजन कोणती मुख्य भूमिका बजावतो?
इलेक्ट्रॉन दाता इलेक्ट्रॉन ग्राही प्रोटॉन दाता प्रोटॉन ग्राही
उत्तर : इलेक्ट्रॉन ग्राही
9. अतिश्रमामुळे स्नायूदुखीमध्ये खालीलपैकी कोणते रसायन जबाबदार असते?
लॅक्टिक आम्ल इथोनॉल फॉरमिक आम्ल अॅस्कोरबिक आम्ल
उत्तर : लॅक्टिक आम्ल
10. खालीलपैकी कोणता आजार बरा करण्यास 'अॅग्रीमायसीन' वापरतात.....
कवक आजार विषाणू आजार जिवाणू आजार कवकवीद्रव्य आजार
उत्तर : जिवाणू आजार
11. खालीलपैकी मॅक्रोन्यूट्रियंट कोणते आहे?
मॅग्नेशियम मॉलीबडेनियम बोरॉन झिंक
उत्तर : मॉलीबडेनियम
12. ग्लुकोजमध्ये कार्बनची टक्केवारी ----- आहे.
40% 53% 45% 55%
उत्तर : 40%
13. पुढीलपैकी कोणते क्षार शरीरातील आम्ल-क्षार (अॅसिड-बेस) संतुलन राखते?
कॅल्शियम सोडीयम पोटॅशियम लोह
उत्तर : सोडीयम
14. रासायनिक पदार्थाचा आर्द्रताग्राही स्वभावगुणधर्म दर्शवितो की तो चांगला
ऑक्सीडिकारक अभिकर्ता निर्जलन अभिकर्ता क्षपणकारक अभिकर्ता क्लिष्टीकरण अभिकर्ता
उत्तर : निर्जलन अभिकर्ता
15. महाराष्ट्रामध्ये बारमाही वाहणारी नदी कोणती?
नर्मदा कावेरी गोदावरी कोणतीही नाही
उत्तर : कोणतीही नाही
16. a- कण ह्यांनी शिधून काढले?
जे.जे. थॉमसन ए. आईस्टाईन ई-रुदरफोर्ड मादाम क्युरी
उत्तर : ई-रुदरफोर्ड
17. सहकारी संस्थांचे आर्थिक वर्ष ----- हे असते.
1 एप्रिल ते 31 मार्च 1 जानेवारी ते 31 डिसेंबर 1 जुलै ते 30 जून 1 मे ते 30 एप्रिल
उत्तर : 1 एप्रिल ते 31 मार्च
18. 'त्सुनामी' या जापानी शब्दातील 'त्सु' आणि 'नामी' म्हणजे काय?
संपूर्ण विनाश राक्षसी लाट बंदर लाट हिंस्त्र लाट
उत्तर : बंदर लाट
19. 'चांगला खेळला निळा, लाल जिंकलेला आहे!' हे रेफरीचे वाक्य आपण सर्वसाधारणपणे कुठे ऐकतो?
फुटबॉल बास्केटबॉल स्क्वोश बॉक्सिंग
उत्तर : बॉक्सिंग
20. राज्य प्रशासकीय लवादाच्या अध्यक्षाची नेमणूक कोण करतात?
राज्यपाल राष्ट्रपती उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश राष्ट्रीय न्यायिक आयोग
उत्तर : राष्ट्रपती