Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu
Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu
Showing posts with label भूगोल. Show all posts
Showing posts with label भूगोल. Show all posts

Monday, 23 May 2016

सूर्यमालेतील ग्रह व त्यासंबंधीची माहिती :

1. ग्रहाचे नाव - बूध

सूर्यापासुन चे अंतर - 5.79  
 परिवलन काळ - 59
 परिभ्रमन काळ - 88 दिवस
 इतर वैशिष्टे - सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह, आकाराने सर्वात लहान व सूर्यमालिकेतील सर्वात वेगवान ग्रह असून या ग्रहाला एकही उपग्रह नाही.

2. ग्रहाचे नाव - शुक्र

सूर्यापासुन चे अंतर - 10.82  
 परिवलन काळ - 243 दिवस
 परिभ्रमन काळ - 224.7 दिवस
 इतर वैशिष्टे - सूर्यकुलातील सर्वात तेजस्वी ग्रह पृथ्वीवरून संध्याकाळी व सकाळी आकाशात दिसतो. हा स्वत:भोवती पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरतो.

3. ग्रहाचे नाव - पृथ्वी

सूर्यापासुन चे अंतर - 14.96  
 परिवलन काळ - 23.56 तास
 परिभ्रमन काळ - 365 1/4 दिवस
 इतर वैशिष्टे - सूर्यमालिकेत केवळ पृथ्वीवरच प्राणीसृष्टी व वनस्पती सृष्टी आढळते. हा ग्रह जलग्रह म्हणून ओळखला जातो. चंद्र हा पृथ्वीचा उपग्रह आहे.

4. ग्रहाचे नाव - मंगळ

सूर्यापासुन चे अंतर - 22.9  
 परिवलन काळ - 24.37 तास
 परिभ्रमन काळ - 687
 इतर वैशिष्टे - शुक्रानंतरचा पृथ्वीच्या जवळील दूसरा ग्रह. या ग्रहास दोन उपग्रह आहेत.

5. ग्रहाचे नाव - गुरु

सूर्यापासुन चे अंतर - 77.86
 परिवलन काळ - 9.50 तास
 परिभ्रमन काळ - 11.86 वर्षे
 इतर वैशिष्टे - सूर्यकुलातील सर्वात मोठा ग्रह असून गुरूला त्रेसष्ट उपग्रह आहेत.

6. ग्रहाचे नाव - शनि

सूर्यापासुन चे अंतर - 142.6
 परिवलन काळ - 10.14 तास
 परिभ्रमन काळ - 29 1/2 वर्ष
 इतर वैशिष्टे - सूर्यकुलातील दूसरा मोठा ग्रह या ग्रहाभोवती कडी आहेत. या ग्रहास त्रेपन्न उपग्रह आहेत.

7. ग्रहाचे नाव - युरेनस  

सूर्यापासुन चे अंतर - 268.8
 परिवलन काळ - 16.10 तास
 परिभ्रमन काळ - 84 वर्षे
 इतर वैशिष्टे - या ग्रहाचा शोध 13 मार्च 1781 रोजी जर्मन खगोल शास्त्रज्ञ हर्षलने लावला. हा ग्रह जर्मन देवता युरेनस या नावाने ओळखला जातो. या ग्रहास सत्तावीस उपग्रह आहेत. हा स्वत:भोवती पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरतो.

8. ग्रहाचे नाव - नेपच्यून  

सूर्यापासुन चे अंतर - 449.8
 परिवलन काळ - 16 तास
 परिभ्रमन काळ - 164 1/2 वर्षे
 इतर वैशिष्टे - या ग्रहाचा शोध सन 1886 मध्ये लागला.

या ग्रहास एकूण तेरा उपग्रह आहेत.

हा स्वत:भोवती पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरतो.

सूर्यमालेतील ग्रह व त्यासंबंधीची माहिती :

1. ग्रहाचे नाव - बूध

सूर्यापासुन चे अंतर - 5.79  
 परिवलन काळ - 59
 परिभ्रमन काळ - 88 दिवस
 इतर वैशिष्टे - सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह, आकाराने सर्वात लहान व सूर्यमालिकेतील सर्वात वेगवान ग्रह असून या ग्रहाला एकही उपग्रह नाही.

2. ग्रहाचे नाव - शुक्र

सूर्यापासुन चे अंतर - 10.82  
 परिवलन काळ - 243 दिवस
 परिभ्रमन काळ - 224.7 दिवस
 इतर वैशिष्टे - सूर्यकुलातील सर्वात तेजस्वी ग्रह पृथ्वीवरून संध्याकाळी व सकाळी आकाशात दिसतो. हा स्वत:भोवती पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरतो.

3. ग्रहाचे नाव - पृथ्वी

सूर्यापासुन चे अंतर - 14.96  
 परिवलन काळ - 23.56 तास
 परिभ्रमन काळ - 365 1/4 दिवस
 इतर वैशिष्टे - सूर्यमालिकेत केवळ पृथ्वीवरच प्राणीसृष्टी व वनस्पती सृष्टी आढळते. हा ग्रह जलग्रह म्हणून ओळखला जातो. चंद्र हा पृथ्वीचा उपग्रह आहे.

4. ग्रहाचे नाव - मंगळ

सूर्यापासुन चे अंतर - 22.9  
 परिवलन काळ - 24.37 तास
 परिभ्रमन काळ - 687
 इतर वैशिष्टे - शुक्रानंतरचा पृथ्वीच्या जवळील दूसरा ग्रह. या ग्रहास दोन उपग्रह आहेत.

5. ग्रहाचे नाव - गुरु

सूर्यापासुन चे अंतर - 77.86
 परिवलन काळ - 9.50 तास
 परिभ्रमन काळ - 11.86 वर्षे
 इतर वैशिष्टे - सूर्यकुलातील सर्वात मोठा ग्रह असून गुरूला त्रेसष्ट उपग्रह आहेत.

6. ग्रहाचे नाव - शनि

सूर्यापासुन चे अंतर - 142.6
 परिवलन काळ - 10.14 तास
 परिभ्रमन काळ - 29 1/2 वर्ष
 इतर वैशिष्टे - सूर्यकुलातील दूसरा मोठा ग्रह या ग्रहाभोवती कडी आहेत. या ग्रहास त्रेपन्न उपग्रह आहेत.

7. ग्रहाचे नाव - युरेनस  

सूर्यापासुन चे अंतर - 268.8
 परिवलन काळ - 16.10 तास
 परिभ्रमन काळ - 84 वर्षे
 इतर वैशिष्टे - या ग्रहाचा शोध 13 मार्च 1781 रोजी जर्मन खगोल शास्त्रज्ञ हर्षलने लावला. हा ग्रह जर्मन देवता युरेनस या नावाने ओळखला जातो. या ग्रहास सत्तावीस उपग्रह आहेत. हा स्वत:भोवती पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरतो.

8. ग्रहाचे नाव - नेपच्यून  

सूर्यापासुन चे अंतर - 449.8
 परिवलन काळ - 16 तास
 परिभ्रमन काळ - 164 1/2 वर्षे
 इतर वैशिष्टे - या ग्रहाचा शोध सन 1886 मध्ये लागला.

या ग्रहास एकूण तेरा उपग्रह आहेत.

हा स्वत:भोवती पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरतो.

Wednesday, 30 March 2016

भारताचे मानचिन्हे :

राष्ट्रीय नदी : गंगा
 राष्ट्रीय महाकाव्य : गीता
 राष्ट्रीय जलजीव : गंगा डॉल्फिन
 राष्ट्रीय फळ : आंबा
 राष्ट्रीय विरासत पशु : हत्ती
 राष्ट्रीय खेळ : हॉकी
 राष्ट्रीय वृक्ष : वड
 राष्ट्रीय पशु : वाघ

महाराष्ट्राची मानचिन्हे :

महाराष्ट्राची राजधानी - मुंबई
 उपराजधानी - नागपूर
 राज्य फळ - आंबा
 राज्य फूल - मोठा बोंडारा किंवा तामन
 राज्य पक्षी - हारावत
 राज्य प्राणी - शेकरू
 राज्य भाषा - मराठी

Monday, 28 March 2016

भारतातील जंगलाविषयी माहिती :

भारत सरकारच्या वन व पर्यावरण विभागामार्फत प्रसिद्ध करण्यात आलेल्या अहवालानुसार भारतातील 78 लाख 29 हजार चौ. हेक्टर जमिनक्षेत्र वनाखाली असून भारताच्या एकूण जमिनक्षेत्राच्या 23.81 जमिनक्षेत्र जंगलाखालील आहे.
 भारतातील 28 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशाचा विचार केल्यास काही राज्यामध्ये जंगलाचे प्रमाण कमी झाले असून काही राज्यामध्ये जंगलाचे प्रमाण वाढलेले आहे.

भारतातील जंगलाचे प्रमाण व राज्ये -

आकारमानानुसार सर्वाधिक जंगल असलेले राज्य -

भारतात सर्वात जास्त जंगलाचे प्रमाण मध्यप्रदेश राज्यात (94,689 चौ.कि.मी.) असून दूसरा क्रमांक आंध्रप्रदेश (63,814 चौ.कि.मी.) राज्याचा आणि तिसरा क्रमांक महाराष्ट्राचा (61,939 चौ.कि.मी.) लागतो.
 

क्षेत्रफळानुसार जंगलाचे प्रमाण जास्त असलेले राज्य -

क्षेत्रफळानुसार सर्वात जास्त जंगलाचे प्रमाण सिक्कीम (82.31%) राज्यात आहे. त्यानंतर अनुक्रमे दूसरा क्रमांक मिझोरम (79.30%) व तिसरा क्रमांक मणीपुर (78.01%) लागतो. केंद्रशासीत प्रदेशात सर्वाधिक जंगले लक्षव्दिप बेटामध्ये आहे.
 

सर्वात कमी जंगल नसलेले राज्य -

हरियाणा राज्यामध्ये सर्वात कमी जंगले असून हरियाणामधील फक्त 3.53% जमीन जंगलाखाली आहे. त्यानंतर अनुक्रमे पंजाब (6.12%) व बिहार (6.87%) जमीन जंगलाखाली आहे.

Saturday, 26 March 2016

फळे व व्यापारी पिकांकरीता प्रसिद्ध राज्ये :

फळे                    राज्ये

चहा     :-            आसाम (प्रथम), पश्चिम बंगाल, केरळ, कर्नाटक, तामीळनाडू

कॉफी    :-         कर्नाटक (प्रथम),   केरळ

कापूस    :-         गुजरात (प्रथम),
पंजाब, महाराष्ट्र, मध्यप्रदेश, राजस्थान         

ताग      :-          पश्चिम बंगाल (प्रथम), आसाम, त्रिपुरा, बिहार, ओरिसा

तंबाखू   :-            तेलंगणा (प्रथम), तामीळनाडू, कर्नाटक, महाराष्ट्र

ऊस       :-        उत्तरप्रदेश (प्रथम), महाराष्ट्र, तामिळनाडू, तेलंगणा

रबर       :-      केरळ (प्रथम), तामिळनाडू

भारतातील प्रमुख पिके :

पिके          राज्ये

गहू   :-       उत्तरप्रदेश (प्रथम), पंजाब, हरियाणा

तांदूळ :-         पश्चिम बंगाल (प्रथम), पंजाब व उत्तरप्रदेश

ज्वारी   :-       कर्नाटक (प्रथम), महाराष्ट्र व आंध्रप्रदेश

बाजारी   :-       राजस्थान (प्रथम), उत्तरप्रदेश, गुजरात

मका   :-       कर्नाटक, तेलंगणा, आंध्रप्रदेश व महाराष्ट्र

कापूस   :-       गुजरात (प्रथम), महाराष्ट्र व तेलंगणा

बार्ली  :-        राजस्थान (प्रथम), उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश

उस    :-      उत्तरप्रदेश (प्रथम), महाराष्ट्र, कर्नाटक

भुईमूग   :-       गुजरात (प्रथम), तेलंगणा, तामीळना

डूदाळवर्गीय पिके    :-      मध्यप्रदेश (प्रथम), उत्तरप्रदेश व मध्यप्रदेश

सोयाबीन     :-     मध्यप्रदेश, महाराष्ट्र व राजस्थान

सूर्यफूल   :-       कर्नाटक, आंध्रप्रदेश व महाराष्ट्र

आलू   :-       पश्चिम बंगाल, उत्तरप्रदेश व पंजाब

कांदा   :-       महाराष्ट्र, कर्नाटक व गुजरात

Friday, 25 March 2016

भारतातील पर्वतरांगामधील प्रमुख शिखरे :

शिखराचे नाव उंची (मीटर) राज्य

1 )  अन्नागुडई  2,695  केरळ

2)  दोडाबेट्टा  2,637  तामिळनाडू

3)  गुरुशिखर  1,722  राजस्थान

4)  कळसूबाई  1,646  महाराष्ट्र 

5)  महेंद्रगिरी  1,501  ओडिसा

6)  मलयगिरी  1,187ओडिसा 

7)  पूर्वघाट लांबी  1,097 कि.मी.-

8)  पश्चिम घाट लांबी1,700 कि.मी.-

Wednesday, 23 March 2016

पृथ्वीवरील भूस्वरुपाचे प्रकार :

व्दिपकल्प - एखाद्या भूभागाच्या तीन भागास पाणी व एका भागास जमीन असेल तर त्यास व्दिपकल्प असे म्हणतात. भारताचा दक्षिणेकडील भाग हा व्दिपकल्प म्हणून ओळखला जातो.
 भूशीर - व्दिपकल्पाचे अत्यंत निमुळते टोक समुद्रात खोलवर गेले असेल तर ते टोक भूशीर म्हणून ओळखले जाते. आफ्रिका खंडाच्या दक्षिणेकडील टोक केप ऑफ गुड होप जगातील सर्वात मोठे भूशीर ओळखले जाते.
 खंडांतर्गत समुद्र - मध्यभागी समुद्र व भोवताली जमीन असल्यास त्या समुद्राला खंडातर्गत समुद असे म्हणतात.
 बेट - एखाद्या भूखंडाच्या सभोवताली सर्वच बाजूने पाणीच असेल तर, असा भूखंड बेट म्हणून ओळखला जातो.
 समुद्रधुनी - काही ठिकाणी पाण्याचा चिंचोळा भाग दोन भूखंडाच्यामध्ये पसरलेला असतो. ही चिंचोळी पाण्याची पट्टी सागराच्या दोन्ही भागाला जोडली जाते. त्याला समुद्रधुनी असे म्हणतात.
 संयोगभूमी - दोन खंडांना जोडणारा जमिनीचा चिंचोळा भाग म्हणजे संयोगभूमी होय.
 आखात - उपसागरांहूनही निमुळता असा समुद्राचा भाग तीन बाजूंनी जमिनीचे वेढला जातो तेव्हा त्यास आखात असे म्हणतात.
 खाडी - आखातापेक्षाही चिंचोळा जमिनीत घुसलेला समुद्राचा पट्टा म्हणजे खाडी होय.
 समुद्र किंवा सागर - महासागरापेक्षा आकाराने लहान असणार्‍या खार्‍या पाण्याच्या साठयाला समुद्र किंवा सागर असे म्हणतात. सागर हे महासागराचाच भाग असतो तर, काही समुद्र हे भुवेष्टित असतात.
उदा. अरबी समुद्र, भूमध्यसमुद्र, कॅस्पियन समुद्र.
 उपसागर - खार्‍या पाण्याच्या ज्या जलाशयाला तीनही बाजूंनी जमिनीने वेढलेले असते त्या जलाशयाला उपसागर असे म्हणतात. उपसागर हा सागरापेक्षा लहान असतो. उदा. बंगालचा उपसागर 

पृथ्वीला प्राप्त झालेल्या गती व त्याचे परिणाम :

पृथ्वी सूर्याभोवती तसेच स्वत:भोवती फिरते. यामुळे पृथ्वीला परिवलन आणि परीभ्रमण अशा दोन गती प्राप्त झालेल्या आहेत.

1. परिवलन गती -

पृथ्वीच्या स्वत:भोवतीच्या फिरण्याला परिवलन गती किंवा दैनिक गती असे सुद्धा म्हणतात. पृथ्वीला स्वत:भोवती एक फेरी पूर्ण करण्यास 23 तास 56 मिनीटे 4 सेकंद लागतात.
 सापेक्षता हा कालावधी चोवीस तासाचा मानला जातो. पृथ्वी स्वत:भोवती पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते. पृथ्वीचा परिवलन वेग विषुववृत्तावर सर्वात जास्त असून ध्रुवावर सर्वात कमी आहे. विषववृत्तावर पृथ्वीच्या परिवलनाचा वेग 1665.6 कि.मी. इतका आहे. पृथ्वीच्या परिवलन गतीमुळे पृथ्वीवर खालील परिणाम घडून आलेले आहेत.
 दिवस व रात्र चक्र - पृथ्वीच्या परिवलन गतीमुळे पृथ्वीवर दिवस आणि रात्र होण्याचे चक्र सुरू झाले असून पृथ्वीच्या ज्या भागावरच सूर्यकिरण पडतात तो भाग प्रकाशमान होवून तेथे दिवस होतो व राहिलेल्या अर्ध्या भागावर अंधार पडतो म्हणजे तेथे रात्र होते. पृथ्वीवरील दिवस रात्र चक्र अखंड चालू आहे.
 सागर प्रवाह - पृथ्वीच्या परिवलन गतीमुळे सागराच्या पाण्याला वेग प्राप्त होतो. विषवृत्तीय प्रदेशातील पाणी पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहत जाते. यालाच सागर प्रवाह असे म्हणतात.
 वार्‍यांना दिशा प्राप्त होते - पृथ्वीच्या परिवलन गतीमुळे वार्‍याची दिशा बदलते. याबाबतचा नियम फेरेल या शास्त्रज्ञाने मांडला. त्यांच्या मते पृथ्वीच्या परिवलन गतीमुळे उत्तर गोलार्धातील वारे त्यांच्या उजवीकडे आणि दक्षिण गोलार्धातील वारे डावीकडे झुकतात.

2. परिभ्रमन गती -

पृथ्वीच्या सूर्याभोवती फिरण्याला पृथ्वीची परीभ्रमण किंवा पृथ्वीची वार्षिक गती म्हणतात. पृथ्वीला सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यास 365.25 दिवस लागतात. पृथ्वीच्या आसाने परीभ्रमण कक्षेच्या प्रतलाशी 66 1/2° अंशाचा कोन केला आहे.
 पृथ्वीचे उत्तर ध्रुवाकडील टोक सतत धृव तार्‍याकडे रोखलेले राहते. याला पृथ्वीच्या आसाचा तिरपेपणा असे म्हणतात. पृथ्वीच्या परीभ्रमणामुळे व आसाच्या तिरपेपणामुळे पृथ्वीवर खालील गोष्टी घडून येतात.
 

3. सूर्याचे उत्तरायण व दक्षिणायन -

पृथ्वीच्या परिभ्रमन काळात (एका वर्षात) सूर्याचे निरीक्षण केल्यास सूर्य 23 1/2° उत्तर ते 23 1/2° दक्षिण या दोन अक्षांशामध्ये प्रवास करीत असल्याचे दिसतो. यालाच सूर्याचे भासमान भ्रमण असे म्हणतात. या घटनेमुळे सूर्य 21 जून रोजी कर्कवृत्तावर (23 1/2° उत्तर) असतो. 21 जून नंतर सूर्य दक्षिणेकडे प्रवास करू लागतो. याला सूर्याचे दक्षिणायन असे म्हणतात.
 23 सप्टेंबर रोजी सूर्य विषुववृत्तावर असतो.
 22 डिसेंबर रोजी सूर्य मकरवृत्तावर (23 1/2° दक्षिण) पोहचतो. या दिवसापासून सूर्य उत्तरेकडे प्रावास करू लागतो. याला सूर्याचे उत्तरायण काळ म्हणून ओळखला जातो.
 असमान दिवस व रात्र - पृथ्वीचे परीभ्रमण व आसाचे तिरपेपण यामुळे पृथ्वीवर असमान दिवस व रात्र निर्माण झालेले आहेत.
 पृथ्वीवर 21 जून रोजी सूर्य कर्कवृत्तावर (उत्तर गोलार्धात) असतो, या दिवशी कर्कवृत्तावर दिवस मोठा व रात्र लहान असते आणि मकरवृत्तावर (दक्षिण गोलार्धात) दिवस लहान व रात्र मोठी असते.
 21 मार्च व 23 सप्टेंबर रोजी सूर्य विषुववृत्तावर असतो. या दिवशी पृथ्वीवर सर्वत्र दिवस व रात्र बारा तासाची असते.
 22 डिसेंबर रोजी सूर्य मकरवृत्तावर (दक्षिण गोलार्धात) असतो. या दिवशी मकरवृत्तावर सर्वात मोठा दिवस व रात्र लहान असते आणि याच दिवशी कर्कवृत्तवार (उत्तर गोलार्धात) सर्वात मोठी रात्र व दिवस लहान असतो.

4. काल्पनिक वृत्ते -

सूर्याच्या दक्षिणायन व उत्तरायणामुळे पृथ्वीवर उत्तर गोलार्धात 23 1/2° उत्तर अक्षांशावर कर्कवृत्त व दक्षिण गोलार्धात 23 1/2° दक्षिण आक्षांशावर मकरवृत्त हे काल्पनिक वृत्त निर्माण झालेले आहे.
 पृथ्वीवर कटीबंध - पृथ्वीच्या आसाच्या तिरपेपणामुळे आणि पृथ्वीच्या परिभ्रमणामुळे पृथ्वीवरील 23 1/2° 1/2° उत्तर आणि 23 1/2° दक्षिण ते 66 1/2° दक्षिण अक्षांक दरम्यानचा प्रदेश समशीतोष्ण कटीबंध म्हणून व 661/2° ते 90° उत्तर किंवा दक्षिण या भागातील प्रदेश शीत कटीबंध म्हणून ओळखला जातो.
 पृथ्वीवर ऋतूंची निर्मिती - पृथ्वीवरील असमान दिवस रात्र यामुळे ऋतू निर्माण झालेले आहेत.
 उन्हाळा ऋतू - 21 मार्च ते 23 सप्टेंबर या काळात उत्तर गोलार्धात दिवस मोठा असल्यामुळे प्रकाश व उष्णता जास्त वेळ मिळते. या कारणामुळे या भागात उन्हाळा असतो तर दक्षिण गोलार्धात हिवाळा असतो.
 हिवाळा ऋतू - 23 सप्टेंबर ते 21 मार्च या काळात उत्तर गोलार्धात दिवस लहान व रात्र मोठी असते. यामुळे तेथे उष्णता व प्रकाश कमी काळ मिळतो आणि उष्णता उत्सर्जनाचा काळ जास्त असतो. या कारणामुळे उत्तर गोलार्धात हिवाळा असतो. तर दक्षिण गोलार्धात उन्हाळा असतो.

Monday, 21 March 2016

महाराष्ट्र पठाराची निर्मिती

महाराष्ट्र पठाराची निर्मिती



महाराष्ट्र पठाराची निर्मिती ज्वालामुखीच्या
उद्रेकातून झाली.70 दशलक्ष वर्षापूर्वी -
भ्रंशमुलक उद्रेक झाला व लाव्हारसाचे
संचयन झाले. अशा प्रकारच्या अनेक
उद्रेकापासून महाराष्ट्र पठार तयार झाले. या
पठारावर अग्निजन्य खडक
आढळतात.भुपृष्टावर किंवा कमी खोलीवर
आढळणारे 'असिताश्म व कृष्णप्रस्तर' हे
दोन प्रकारचे खडक आढळतात.महाराष्ट्र
पठारावर उत्तरेकडून दक्षिणेकडे पुढील खोरी
आढळतात.

तापी-पूर्णा खोरे
गोदावरी खोरे
प्रणहिता खोरे
भीमा खोरे
कृष्णा खोरे

आर्कियन खडक :

हा अतिप्राचीन खडक पूर्व विदर्भा, चंद्रपुर,
भंडारा, गडचिरोली, नांदेड जिल्ह्याचा
पूर्वभाग आणि सिंधुदुर्गातील काही
तालुक्यांमध्ये आढळतो.
ग्रँनाईट, नीस व शिस्ट प्रकारच्या
खडकांपासून बनलेल्या या भुस्तरात लोह
खनिजांचे विपुल साठे आहेत.
धारवाड खडक : या श्रेणीच्या खडकांमध्ये
ग्रँन्जुलाईट्स
, डोलोमाईट, अभ्रक, सिलीमनाईट,
हॉर्नब्लेंड, शीष्ट, संगमरवर यांसारखी
मौल्यवान खनिजे आढळतात.
पूर्व नागपुर, भंडारा, गोंदिया, सिंधुदुर्ग व
कोल्हापूर जिल्ह्यातही धारवाड श्रेणीचे
खडक आढळतात.
पुणे, नागपुर, भंडारा, गोंदिया, सिंधुदुर्ग व
कोल्हापूर जिल्ह्यातही हा खडक आढळतो.
कडप्पा श्रेणींचा खडक : महाराष्ट्रातील
दक्षिण व पूर्व भागात हा खडक आढळतो.
कोल्हापूर जिल्ह्यात या श्रेणीतील खडकात
क्वार्टझाईट्स, शेल व चुनखडीचे खडक
आहेत.
 विंध्ययन खडक : विंध्ययन श्रेणीतील
खडक चंद्रपुर जिल्ह्यातच आढळतात.
हा खडक सुबक बांधकामासाठी उपयुक्त
असून दर्जेदार व टिकाऊ असतो.
गोंडवना खडक : अप्पर पॉलिओझाईक
नंतरच्या कालखंडात व्दीपखंडावर अनेक
बदल होऊ न दख्खनच्या पठारावर स्थानिक
पातळीवर हालचाली निर्माण झाल्या.
खोर्यांच्या आकाराचा खोलगट भाग निर्माण
होऊन तेथे नद्यांनी आणलेल्या गाळाचे
संचयन झाले.
कालांतराने त्यात प्राणी, वनस्पतीचे अवशेष
व जंगले गाडली गेली व त्याचे दगडी कोळशात
रूपांतर झाले.
त्याला 'गोंडवना खडक' असे म्हणतात.
चंद्रपुर, यवतमाळ, गडचिरोली व अमरावती
जिल्ह्यात अप्पर गोंडवना खडक आढळतात.

सूर्यमालेतील ग्रह व त्यासंबंधीची माहिती :

1. ग्रहाचे नाव - बूध

सूर्यापासुन चे अंतर - 5.79  
 परिवलन काळ - 59
 परिभ्रमन काळ - 88 दिवस
 इतर वैशिष्टे - सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह, आकाराने सर्वात लहान व सूर्यमालिकेतील सर्वात वेगवान ग्रह असून या ग्रहाला एकही उपग्रह नाही.

2. ग्रहाचे नाव - शुक्र

सूर्यापासुन चे अंतर - 10.82  
 परिवलन काळ - 243 दिवस
 परिभ्रमन काळ - 224.7 दिवस
 इतर वैशिष्टे - सूर्यकुलातील सर्वात तेजस्वी ग्रह पृथ्वीवरून संध्याकाळी व सकाळी आकाशात दिसतो. हा स्वत:भोवती पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरतो.

3. ग्रहाचे नाव - पृथ्वी

सूर्यापासुन चे अंतर - 14.96  
 परिवलन काळ - 23.56 तास
 परिभ्रमन काळ - 365 1/4 दिवस
 इतर वैशिष्टे - सूर्यमालिकेत केवळ पृथ्वीवरच प्राणीसृष्टी व वनस्पती सृष्टी आढळते. हा ग्रह जलग्रह म्हणून ओळखला जातो. चंद्र हा पृथ्वीचा उपग्रह आहे.

4. ग्रहाचे नाव - मंगळ

सूर्यापासुन चे अंतर - 22.9  
 परिवलन काळ - 24.37 तास
 परिभ्रमन काळ - 687
 इतर वैशिष्टे - शुक्रानंतरचा पृथ्वीच्या जवळील दूसरा ग्रह. या ग्रहास दोन उपग्रह आहेत.

5. ग्रहाचे नाव - गुरु

सूर्यापासुन चे अंतर - 77.86
 परिवलन काळ - 9.50 तास
 परिभ्रमन काळ - 11.86 वर्षे
 इतर वैशिष्टे - सूर्यकुलातील सर्वात मोठा ग्रह असून गुरूला त्रेसष्ट उपग्रह आहेत.

6. ग्रहाचे नाव - शनि

सूर्यापासुन चे अंतर - 142.6
 परिवलन काळ - 10.14 तास
 परिभ्रमन काळ - 29 1/2 वर्ष
 इतर वैशिष्टे - सूर्यकुलातील दूसरा मोठा ग्रह या ग्रहाभोवती कडी आहेत. या ग्रहास त्रेपन्न उपग्रह आहेत.

7. ग्रहाचे नाव - युरेनस  

सूर्यापासुन चे अंतर - 268.8
 परिवलन काळ - 16.10 तास
 परिभ्रमन काळ - 84 वर्षे
 इतर वैशिष्टे - या ग्रहाचा शोध 13 मार्च 1781 रोजी जर्मन खगोल शास्त्रज्ञ हर्षलने लावला. हा ग्रह जर्मन देवता युरेनस या नावाने ओळखला जातो. या ग्रहास सत्तावीस उपग्रह आहेत. हा स्वत:भोवती पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरतो.

8. ग्रहाचे नाव - नेपच्यून  

सूर्यापासुन चे अंतर - 449.8
 परिवलन काळ - 16 तास
 परिभ्रमन काळ - 164 1/2 वर्षे
 इतर वैशिष्टे - या ग्रहाचा शोध सन 1886 मध्ये लागला. या ग्रहास एकूण तेरा उपग्रह आहेत. हा स्वत:भोवती पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरतो.

सूर्यासंबधीची माहिती :

सूर्याचे पृथ्वीपासून अंतर - 14,95,00,000 किलोमीटर
 सूर्याची किरणे पृथ्वीवर येण्यास लागणारा वेळ - आठ मिनिटे
 सूर्याचा व्यास - 13,91,980 कि.मी. पृथ्वीच्या व्यासाच्या 108 पट
 सूर्याची गुरुत्वाकर्षण शक्ति - पृथ्वीच्या 28 पट जास्त आहे.
 सूर्याला परिवलनास लागणारा कालावधी - 26.8 दिवस
 सूर्याच्या बाह्य कक्षेतील तापमान - 60000 से.
 सूर्याच्या आंतरभागातील तापमान - 30,0000 से. पेक्षाही अधिक
 सूर्यकुलातील एकूण ग्रह - आठ

Saturday, 19 March 2016

सह्यांद्री चा पश्चिम घाट
जागतिक वारसा

२००६ साली भारताने यूनेस्को कडे पश्चिम
घाटाला जागतिक वारसा स्थानांमध्ये
समाविष्ट करण्यासाठी विनंती केली
आहे. यामध्ये एकंदर सात उपक्षेत्रे
असतील.
1. अगस्त्यमलाई उपक्षेत्र - यामध्ये
अगस्त्यमलाई संरक्षित जैविक क्षेत्र
(९०० वर्ग कि.मी.) ज्यामध्ये
तमिळनाडूतील कलक्कड मुंडणथुराई व्याघ्र
प्रकल्प (८०६ वर्ग कि.मी.) व नेय्यार
अभयारण्य , पेप्पारा तसेच शेंदुर्णीव
त्याच्या आसपास असणारे आचेनकोईलचे
क्षेत्र , थेन्मला, कोन्नी , पुनलुर ,
तिरुवनंतपुरम आणि अगस्त्यवनम, केरळ
यांचा समावेश आहे.
2. पेरियार उपक्षेत्र - यामध्ये केरळमधील
पेरियार राष्ट्रीय उद्यान (७७७ वर्ग
कि.मी.), रान्नी , कोन्नी व
आचनकोविल इथली जंगले. पूर्वेला
श्रीविल्लीपुत्तुर अभयारण्य व तिरुनवेली
इथली जंगले यांचा समावेश आहे.
3. अनामलाई उपक्षेत्र - यामध्ये चिन्नार
अभयारण्य , एराविकुलम राष्ट्रीय उद्यान
(९० वर्ग कि.मी.), इंदिरा गांधी राष्ट्रीय
उद्यान, ग्रास हिल्स राष्ट्रीय उद्यान व
करियन शोला राष्ट्रीय उद्यान (एकूण ९५८
वर्ग कि.मी.) तसेच तमिळनाडूमधील पलानी
पर्वतरांग राष्ट्रीय उद्यान (७३६.८७ वर्ग
कि.मी.) व केरळमधील परांबीकुलम अ
भयारण्य (२८५ वर्ग कि.मी.) यांचा
समावेश आहे. निलगिरी उपक्षेत्र - यामध्ये
निलगिरी संरक्षित जैविक क्षेत्र तसेच
करीम्पुझा राष्ट्रीय उद्यान (२३०
वर्ग कि.मी.), सायलंट व्हॅली राष्ट्रीय
उद्यान (८९.५२ वर्ग कि.मी.) व केरळमधील
वायनाड अभयारण्य (३४४ वर्ग कि.मी.)
आणि तमिळनाडूमधील बंदीपूर राष्ट्रीय
उद्यान (८७४ वर्ग कि.मी), मुकुर्थी
राष्ट्रीय उद्यान (७८.४६ वर्ग कि.मी.),
मुदुमलाई राष्ट्रीय उद्यान (३२१ वर्ग
कि.मी.) तसेच अमरांबलमचे संरक्षित जंगल
(६,००० वर्ग कि.मी.) यांचा समावेश आहे.
4. तळकावेरी उपक्षेत्र - यामध्ये ब्रह्मगिरी
अभयारण्य (१८१.२९ वर्ग कि.मी.), राजीव
गांधी राष्ट्रीय उद्यान (३२१ वर्ग कि.मी),
पुष्पगिरी अभयारण्य (९२.६५
वर्ग कि.मी.), कर्नाटकातील तळकावेरी
अभयारण्य (१०५.०१ वर्ग कि.मी.) व
केरळमधील आरळम संरक्षित
वनक्षेत्र यांचा समावेश आहे.
5. कुद्रेमुख उपक्षेत्र - यामध्ये कुद्रेमुख
राष्ट्रीय उद्यान (६००.३२ वर्ग कि.मी.),
सोमेश्वर अभयारण्य व आजूबाजूची
सोमेश्वरची संरक्षित जंगले तसेच
कर्नाटकातील अगुंबे व बलहल्ली येथील
जंगले यांचा समावेश आहे.
6. सह्याद्री उपक्षेत्र - यामध्ये आंशी
राष्ट्रीय उद्यान (३४० वर्ग कि.मी.),
चांदोली राष्ट्रीय उद्यान (३१७.६७
वर्ग कि.मी.), कोयना अभयारण्य व
राधानगरी अभयारण्य यांचा समावेश आहे.
7. प्राणीजगत पश्चिम घाटात हजारो प्रकारचे
प्राणी आढळतात. यामध्ये जवळजवळ ३२५
प्रजाती या जागतिक स्तरावर
नष्ट व्हायला आलेल्या प्रजाती आहेत.
तसेच उभयचरांमधील बऱ्याच प्रजाती या
फक्त पश्चिम घाटातच आढळतात.
सस्तन प्राणी: पश्चिम घाटात सस्तन
प्राण्यांच्या जवळपास १३९ प्रजाती
आढळतात. यापैकी मलबार
गंधमार्जार व सिंहपुच्छ वानर या
दोन प्रजाती विनाशाच्या मार्गावर आहेत.
पश्चिम घाटात आढळणाऱ्या सिंहपुच्छ
वानरांची संख्या तर फक्त २,५०० आहे.
सिंहपुच्छ वानरांची सर्वात जास्त संख्या ही
सायलंट व्हॅली राष्ट्रीय उद्यानात आढळते.
कुद्रेमुख राष्ट्रीय उद्यानात सुद्धा सिंहपुच्छ
वानरे आढळतात. ही पर्वतरांग वन्यजीवांसाठी
खूप उपयुक्त जागा आहे. निलगिरीचे जैविक
क्षेत्रामध्ये आशियाई हत्ती मोठ्या
प्रमाणावर आढळतात. ब्रह्मगिरी व
पुष्पगिरी अभयारण्येसुद्धा हत्तींसाठी
सुयोग्य निवासस्थान आहे. कर्नाटकातील
पश्चिम घाटात ६,००० पेक्षा जास्त हत्ती
आढळतात (२००४ सालातील गणनेप्रमाणे) व
भारतात सापडणाऱ्या वाघांपैकी १०% वाघ
सुद्धा इथेच आहेत.  . सुंदरबन नंतर भारतात
सर्वात जास्त वाघ हे कर्नाटक, तमिळनाडू व
केरळच्या जंगलातच आढळतात. बंदीपूर
राष्ट्रीय उद्यान व नागरहोल इथे ५,०००
पेक्षा जास्त गौर (बैल) कळप करून राहतात.
कोडागु जंगलांच्या पश्चिमेला निलगिरी
माकडे मोठ्या प्रमाणावर आढळतात. भद्रा
अभयारण्यात हरणांची मोठी संख्या आढळते.
बरेच हत्ती, गौर, सांबर , चित्ते, वाघ इ.
प्राणी केरळमधील जंगलांमध्ये आढळतात.
सरपटणारे प्राणी : अजगराच्या काही जाती
या फक्त पश्चिम घाटातच
आढळतात. उभयचर प्राणी : जगात
आढळणाऱ्या १७९ उभयचर प्राण्यांच्या
प्रजातींपैकी सुमारे ८०% प्रजाती या
फक्त पश्चिम घाटातच आढळतात.

Friday, 18 March 2016

पृथ्वीचे अंतरंग


पृथ्वीच्या अंतर्गत रचना जाणून घेण्याचा
शास्त्रज्ञांनी आतापर्यंत जो प्रयत्न केला,
त्यात प्रत्यक्ष माहितीपेक्षा अप्रत्यक्ष
माहितीवर भर देण्यात आला. प्रत्यक्षात
अंतरंगात जाऊन त्याची पाहणी करणे वा
एखादे यंत्र पाठवून निरीक्षण करणे हे शक्य
नाही, म्हणून भूगर्भशास्त्रज्ञांनी पुढील
गोष्टींचा वा निरीक्षणांचा आधार घेऊन
पृथ्वीचे अंतरंग स्पष्ट करण्याचा प्रयत्न
केला.
पृथ्वीच्या अंतरंगातील तापमान
पृथ्वीच्या अंतरंगातील दाब
पृथ्वीच्या अंतरंगातील घनता
ज्वालामुखी उद्रेकातून बाहेर पडणारे
पदार्थ
उल्कांच्या रचनेचा अभ्यास इ.
भूपृष्ठापासून भूकेंद्रापर्यंतचे अंतर ६३७१
कि.मी. आहे. भूपृष्ठापासून भूकेंद्रापर्यंत
पृथ्वीच्या अंतरंगाच्या स्वरूपात बदल होत
जातो. या बदलत्या
गुणधर्मानुसार भूगर्भशास्त्रज्ञांनी तिचे
पुढील थर पाडले आहेत.
1. शिलावरण/ कवच (Crust)
2. प्रावरण/ मध्यावरण (Mentle)
3. गाभा / केंद्रावरण (Core)
शिलावरणाचा २९ टक्के भाग भूपृष्ठाने, तर
७१ टक्के भागब हा जलव्याप्त आहे. या
आवरणाची खोली सर्वत्र समान
नाही. शिलावरणाची जाडी १६ ते ४०
कि.मी.च्या दरम्यान आहे. हिमालय, रॉकी
यांसारख्या महान
पर्वतश्रेण्यांच्या खाली भूपृष्ठांची जाडी ४०
कि.मी. पेक्षाही जास्त आहे. सागरतळाखाली
शिलावरणाची खोली मात्र सामान्यत: १०
किमीच्या दरम्यान आहे. शिलावरण हे इतर
दोन्ही भागांपेक्षा सर्वात जास्त अरुंद
आहे. ते स्फटिकमय खडकांनी बनले आहे.
स्तरित खडकांचे प्रमाण सर्वात जास्त असून
शिलावरण सिएल, सिमा असे दोन उपविभाग
आहेत.
1. सिअॅल (SIAL) : प्रामुख्याने
भूमिखंडे सिअॅलची बनलेली असतात.
सिलिका व अॅल्युमिनिअम या द्रव्यांच्या
आधिक्यामुळे या थराला सिअॅल असे नाव
पडले. या थराची घनता सुमारे २.७ एवढी
आहे. भूमिखंडाखाली याची सरासरी जाडी
२९ किमी आहे. सिएॅल मुख्यत: गॅ्रनाइट
खडकांपासून बनले असून ग्रॅनाइटचे काही
ठिकाणी रूपांतरित प्रक्रियेमुळे रूपांतरित
खडकात रूपांतर झाले आहे.
2. सिमा (SIMA) : सिमा हा थर सिअॅलच्या
खाली आहे. सिलिका व मॅग्नेशिअम या
घटकद्रव्यांच्या प्रभावामुळे शिलावरणाच्या
थरास सिमा असे नाव पडले. सिमा थराची
जाडी भूमिखंडाखाली १३ किमी
व सागरतळाखाली तीन ते पाच किमी
आहे. सिमा थराची शिलावरणातील व्याप्ती
सुमारे ४२ किमी इतकी आहे. सिमा या थराची
घनता २.९ ते ३.३ इतकी असून हा
थर प्रामुख्याने बॅसाल्ट व ग्रबो प्रकारच्या
खडकांनी बनला आहे. सिअॅल व सिमा या
थरांदरम्यान घनतेत एकदम फरक पडतो
यावरून तेथे कॉनरॅड विलगता आहे, असे
मानले जाते. कॉनरॅड विलगता (Conrade
Discontinuity) : सियाल व सिमा यांची
ज्या भागात घनता बदलते, त्यास
कॉनरॅड विलगता (खंडत्व) असे म्हणतात.
हा विभाग ठिकठिकाणी वेगवेगळ्या खोलीवर
आहे.
प्रावरण/ मध्यावरण (Mentle) :
शिलावरणाच्या खालील थरांस प्रावरण असे
म्हणतात. प्रावरणाचा विस्तार
खोलीनुसार ३३ किमी ते २८६५ किमी इतका
आहे. पृथ्वीच्या एकूण क्षेत्रफळापैकी
प्रावणाने ८३ टक्के भाग व्यापलेला
आहे. पृथ्वीच्या एकूण वस्तुमानापकी
प्रावरणाचे वस्तुमान ६८ टक्के आहे.
प्रावरणाचे तीन भागांत विभाजन केले जाते.
1. मोहविलगतेपासून २०० किमी खोलीपर्यंत
2. २०० किमीपासून ७०० किमी खोलीपर्यंत
3. ७०० किमीपासून तर गाभ्यापर्यंत
या तीन भागांपकी पहिल्या भागात खडकांची
घनता मोठय़ा प्रमाणावर कमीअधिक
होते. मध्यवर्ती भागात खडकांची घनता
पहिल्या भागापेक्षा खूप जास्त आहे, कारण
या खोलीतून प्रवास करताना भूकंप
लहरींचा वेग प्रचंड वाढतो. तिसऱ्या भागाची
घनता मध्यवर्ती भागाच्या तुलनेत कमी
आहे. कारण तेथून भूकंप लहरींचा वेग
सावकाश होत जातो.
मोहविलगता (Moho Discontinuity) :
मोहोरोव्हिसिक शास्त्रज्ञाने शोधून काढलेला
म्हणून याला मोहोरोव्हिसिक / मोहो विलगता
असे म्हणतात. सिमा थराच्या खाली
भूकवच आणि प्रावरण यांना विलग करणारी
ही मोहो विलगता आहे.
गटेनबर्ग विलगता (Gutenberg
Discontinuity) प्रावरण व गाभा यांच्या
सीमावर्ती भागात भूकंप लहरींच्या वेगात
एकदम बदल झालेला दिसतो, म्हणून प्रावरण
व गाभा यांदरम्यान ही विलगता आहे. या
विलगतेस गटेनबर्ग विलगता असे म्हणतात.
गाभा (Core) : पृथ्वीच्या अंतरंगात २८९०
किमी ते ६३७० खोलीपर्यंत गाभ्याचा भाग
आहे. गाभ्याचे दोन भाग पडतात-
बाह्य़ गाभा व अंतर्गाभा.
बाह्य़ गाभा हा भूपृष्ठापासून २८८० किमी ते
५१५० किमीपर्यंत
आढळतो. आंतर्गाभा भूपृष्ठापासून ५१५०
किमी ते ६३७० किमीपर्यंत
आढळतो. बाह्य़ गाभ्यातून दुय्यम भूकंप
लहरी जाऊ शकत नसल्याने हा भाग
द्रवस्थितीत असावा, असा अंदाज केला
जातो. अंतर्भाग हा घनस्वरूप स्थितीत
असतो. अंतर्गाभ्याची घनता सुमारे १३.३
पासून १३.६ घन सें.मी.पर्यंत वाढत
जाते. पृथ्वीचा गाभा मुख्यत्वे निकेल व लोह
हा घटकद्रव्यांपासून बनलेला असल्याने
त्यास निकेल असे म्हणतात.
भूकंप लहरी : ज्या वेळी भूकंप होतो, त्या वेळी
भूकवचात मोठय़ा प्रमाणात हालचाली होतात
व मोठय़ा प्रमाणात कंप निर्माण होतात.
यांनाच 'भूकंप लहरी' असे म्हणतात.
नाभी (Focus) : भूकंप झाल्यावर
भूकवचातील ज्या स्थानापासून उगम पावून
सर्वदूर पसरतात, त्या स्थानास भूकंप केंद्र
किंवा नाभी म्हणतात.
अधीकेंद्र (Epicentre) : नाभीच्या अगदी
वर क्षितिजाजवळच्या लंब रेषेवर पृथ्वीच्या
पृष्ठभागावर जो िबदू मिळतो, त्याला
'अधीकेंद्र' असे म्हणतात.
भूकंपकेंद्रापासून निघणाऱ्या भूकंप लहरींचा
सर्वात अधिक प्रभाव अधीकेंद्राच्या निकट
दिसून येतो. अधिकेंद्रापासून जसजसे अंतर
वाढत जाते, तसेतसे भूकंपाची तीव्रता कमी
कमी होत जाते.
भूकंप अधिलेख (Seismogram) : भूकंप
लहरींचा अभ्यास भूकंप अभिलेखांवरून करता
येतो. भूकंप लहरींचे तीन प्रकार पडतात-
प्राथमिक लहरी, दुय्यम लहरी, भूपृष्ठ लहरी.
1. प्राथमिक लहरी (P waves) : प्राथमिक
लहरींचा वेग इतर सर्व लहरींपेक्षा जास्त
असतो. प्राथमिक लहरी या स्थायुरूप व
द्रव्यरूप पदार्थावरून प्रवेश करू शकतात.
प्राथमिक लहरी या ध्वनी लहरींप्रमाणे
असतात. यात कणांचे कंपन लहरींच्या
संचरण दिशेने घडून येते.
2. दुय्यम लहरी (S waves) : दुय्यम लहरी
या प्रकाश लहरींप्रमाणे असून यात कणांचे
कंपन संचरण दिशेशी समलंब दिशेने घडून
येते. दुय्यम लहरी या घनपदार्थापासून
जाऊ शकतात; परंतु द्रवरूप पदार्थातून त्या
जाऊ शकत नाहीत. सर्व साधारणपणे
त्यांचा वेग प्राथमिक लहरींच्या वेगापेक्षा
निम्मा असतो.
3. भूपृष्ठ लहरी (L waves) : भूपृष्ठ लहरी
या भूपृष्ठांवरूनच सागरी लहरींप्रमाणे
प्रवाहित होतात. सर्व भूकंप
लहरींमध्ये भूपृष्ठ लहरी या अधिक विनाशक
असतात. भूपृष्ठांवरून अधिक खोलवर या
लहरी प्रवास करू शकत नाही. भूपृष्ठ लहरी
पृथ्वीपासून आरपार न जाता पृथ्वीगोलाला
फेरी मारतात. भूकंप अभिलेखावर या
लहरींची नोंद सर्वात शेवटी होते.
रिश्टर स्केल (Richter Scale) :
अमेरिकन भूकंप शास्त्रज्ञ चार्ल्स रिश्टर
यांनी १९३५ साली भूकंपाच्या लहरींची
तीव्रता मोजण्यासांठी रिश्टर प्रमाण शोधून
काढले. याच्या साह्य़ाने भूकंपाच्या तीव्रतेची
सातत्याने नोंद केली जाते. याच्या कक्षा एक
ते नऊ या दरम्यान असतात.
भूकंपाचे जागतिक वितरण:



पॅसिफिक महासागराचा पट्टा : जगातील ६५%
भूकंप प्रदेश पॅसिफिक महासागराच्या
सभोवतालच्या पट्टय़ात आढळतो. याला
प्रशांत महासागरातील पट्टा किंवा
अग्निकंकण (Rings of Fire) असे
म्हणतात. यात इंडोनेशिया,
फिलिपाइन्स, जपानची बेटे, कामचटका
द्वीपकल्प व पूर्व सबेरियातील काही भाग
येतो. भूकंपाचा हा पट्टा उत्तर
अमेरिकेत आल्प्सपासून रॉकीज पर्वत
दक्षिण अमेरिकेत अँडीज पर्वताला अनुसरून
पुढे अंटाक्र्टिका खंडापर्यंत गेलेला आहे. या
भागातच असलेल्या जपानच्या हांशू बेटांवर
जगातील सर्वात जास्त विद्धंसक भूकंप
होतात.
मध्य अटलांटिक पट्टा : या पट्टय़ात
अटलांटिक महासागरातील मध्य
अटलांटिक िरझ आणि रिझजवळील काही
बेटांचा समावेश होतो. येथे सर्वसाधारणपणे
मध्यम तीव्रतेच्या भूकंपाची नोंद झालेली
आहे.
भूमध्य सागरीय पट्टा : या पट्टय़ाचा
विस्तार अटलांटिक महासागरातील जलमग्न
पर्वतरांगेपासून होऊन भूमध्य समुद्राभोवती
पसरलेला आहे. ज्वालामुखी भूगर्भातील
शिलारस, बाष्प, विविध वायू व घटक
द्रव् यांचा भूपृष्ठावर जो उद्रेक होतो, त्याला
ज्वालामुखी असे म्हणतात.
ज्वालामुखीच्या उद्रेकातून बाहेर पडणारे
पदार्थ : ज्वालामुखीच्या उद्रेकातून बाहेर
पडणाऱ्या पदार्थात शिलारस,
वायू, बाष्प, सल्फर डायऑक्साइड,
हायड्रोजन व कार्बन डायऑक्साइड वायू
बाहेर पडतात. शिलारसात सिलिका, लोह
व मॅग्नेशिअम हे पदार्थ
असतात. ज्वालामुखीच्या वेळी खडकांच्या
लहान कणांपासून मोठय़ा तुकडय़ांपर्यंत सर्व
पदार्थ ज्वालामुखी राख या स्वरूपात बाहेर
पडतात. ज्वालामुखीच्या
उद्रेकातून वायूबरोबर बाहेर पडणाऱ्या
पदार्थाला लाव्हारस म्हणतात. या
लाव्हारसाचे सिलिका या घटकाच्या
प्रमाणानुसार दोन प्रकार पडतात.
1. अॅसिड लाव्हा : ज्या लाव्ह्य़ात सिलिकाचे
प्रमाण ७० टक्के किंवा त्यापेक्षाही जास्त
असते, त्याला अॅसिड लाव्हा असे म्हणतात.
हा लाव्हारस अत्यंत घट्ट व रंगाने पिवळसर
असतो.
2. बेसिक लाव्हा : या लाव्हा रसात सिलिकेचे
प्रमाण ३० ते ४० टक्के इतके असते. बेसिक
लाव्हा काळसर असून तो जास्त प्रभावी
असतो.
ज्वालामुखीचे वर्गीकरण
ज्वालामुखीचे वर्गीकरण हे वेगवेगळ्या
प्रकारे केले जाते.ज्वालामुखीच्या उद्रेकाच्या
विशिष्ट केंद्रानुसार पुढील
प्रकार पडतात.
1. हवाईयन ज्वालामुखी : या प्रकारच्या
ज्वालामुखीचे उद्रेक फारसे स्फोटक
नसतात. शिलारस हा पातळ असतो.
घन किंवा वायुरूप पदार्थ पातळ असतात.
हवाई बेटांवर अशा प्रकारचा ज्वालामुखी
असल्याने यास हवाईयन असे नाव देण्यात
आले आहे.
2. स्ट्रॉम्बोलियन ज्वालामुखी : या
ज्वालामुखीतून अल्कधर्मी प्रकारचा
शिलारस बाहेर पडतो. यात वायूंचे
प्रमाण जास्त असल्याने उद्रेक स्फोटक
असतात. भूमध्य सागरातील सिसिली
बेटांजवळ स्ट्रॉम्बोली प्रकारचा
ज्वालामुखी आहे.
3. व्हल्कॅनियन ज्वालामुखी : या प्रकारच्या
ज्वालामुखीतून बाहेर पडणारा शिलारस
जास्त घट्ट असतो. ज्वालामुखीचे उद्रेक
बंद झाल्यावर नलिकेतून शिलारस थंड होतो
व नलिका मुख बंद होते. पुन्हा उद्रेक
झाल्यावर मुखाच्या माथ्याचा खडक वर
उडतो. या प्रकारचे ज्वालामुखी उद्रेक
अतिशय स्फोटक
असतात. स्ट्रॉम्बोलीजवळील लिपारी
बेटावर व्हल्कॅनियन ज्वालामुखी याचे
उदाहरण आहे.
4. पिलीअन ज्वालामुखी : या प्रकारचे
ज्वालामुखी अतिशय स्फोटक असतात. धूळ,
खडकांचे तुकडे ज्वालामुखीच्या स्फोटाच्या
वेळी जास्त प्रमाणात बाहेर पडतात. पिली
येथे अशा प्रकारचा ज्वालामुखी तयार झाला
आहे. उद्रेकाच्या कालखंडानुसार त्याचे
खालील तीन प्रकार पडतात-
5. जागृत ज्वालामुखी : ज्वालामुखीमधून
ज्वालामुखीचा उद्रेक सतत होत असतो,
तसेच ज्यांचा उद्रेक केव्हाही होऊ
शकतो, त्यांना जागृत ज्वालामुखी असे
म्हणतात.
6. निद्रिस्त ज्वालामुखी : ज्या
ज्वालामुखीमधून एके काळी जागृत
ज्वालामुखीप्रमाणे सतत उद्रेक होत
असतात, परंतु सध्या उद्रेक होणे थांबलेले
आहे आणि पुन्हा अचानकपणे
उद्रेक होण्याची शक्यता आहे, अशा
ज्वालामुखीस निद्रिस्त ज्वालामुखी असे
म्हणतात.
7. मृत ज्वालामुखी : ज्या ज्वालामुखीमध्ये
पूर्वी एके काळी उद्रेक होत असत, आता
उद्रेक होत नाहीत, त्यास मृत ज्वालामुखी
असे म्हणतात. उदा. जपानमधील फुजियामा
पर्वत.