Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu
Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu
Showing posts with label सामान्य ज्ञान. Show all posts
Showing posts with label सामान्य ज्ञान. Show all posts

Monday, 23 May 2016

प्रमुख पदावरील व्यक्ती :

भारताचे राष्ट्रपती

डॉ. राजेंद्र प्रसाद  -

26 जानेवारी 1950 ते 13 मे 1962

डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन  -

13 मे 1962 ते 13 मे 1967

डॉ. झाकीर हुसेन -

13 मे 1967 ते 3 मे 1969

डॉ. वराह व्यंकट गिरी (कार्यकारी) -

20 मे 1969 ते 20 जुलै 1969

न्या. महंमद हिदायतुल्ला (कार्यकारी)

- 20 जुलै 1969 ते 21 ऑग. 69

डॉ. वराह व्यंकट गिरी -

24 ऑग. 1969 ते 24 ऑग. 1974

फक्रुद्दीन अली अहमद -

24 ऑगस्ट 1974 ते फेब्रु. 1977

बी.डी. जत्ती (कार्यकारी) -

11 फेब्रु1977 ते 25 जुलै 1977

डॉ. नीलम संजीव रेड्डी -

25 जुलै 1977 ते 25 जुलै 1982

ग्यानी झैलसिंग -

25 जुलै 1982 ते 25 जुलै 1987

राधास्वामी व्यंकटरमण  -

25 जुलै 1987 ते 25 जुलै 1992

डॉ. शंकरद्याल शर्मा -

25 जुलै 1992 ते 25 जुलै 1997

के.आर. नारायणन  -

25 जुलै 1997 ते 25 जुलै 2002

डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम -

25 जुलै 2002 ते 25 जुलै 2007

श्रीमती प्रतिभाताई पाटील -

25 जुलै 2007 ते 25 जुलै 2012

प्रणव मुखर्जी -

25 जुलै 2012 ते पासून कार्यरत

भारताचे पंतप्रधान

पंडित जवाहरलाल नेहरू  -

15 ऑगस्ट 1947 ते 26 मे 1964

श्री. गुलझारीलल नंदा  -

27 मे 1964 ते 9 जून 1964 (13 दिवस कार्यवाह)

श्री. लालबहादूर शास्त्री -

9 जून 1964 ते 11 जाने. 1966

श्री. गुलझारीलाल नंदा (कार्यावह) -

11 जाने. 1966 ते 24 मार्च 1966

श्रीमती इंदिरा गांधी -

24 जाने. 1966 ते 24 मार्च 1977

श्री. मोरारजी देसाई -

24 मार्च 1977 ते 28 जुलै 1979

श्री. चरणसिंग -

28 जुलै 1979 ते 14 जाने. 1980

श्रीमती इंदिरा गांधी -

14 जाने. 1980 ते 31 ऑक्टो. 1984

श्री. राजीव गांधी -

31 ऑक्टो. 1984 ते 2 डिसें. 1989

श्री. व्ही.पी. सिंग -

2 डिसेंबर 1989 ते 7 नोव्हे. 1990

श्री. चंद्रशेखर -

10 नोव्हे. 1990 ते 21 जून 1991

श्री. पी.व्ही. नरसिंहराव -

21 जून 1991 ते 15 मे 1996

श्री. अटलबिहारी वाजपेयी -

16 मे 1996 ते 28 मे 1996

श्री. एच.डी. देवेगौडा -

1 जून 1996 ते 21 एप्रिल 1997

श्री. इंद्रकुमार गुजराल -

21 एप्रिल 1997 ते 19 मार्च 1998

श्री. अटलबिहारी वाजपेयी -

19 मार्च 1998 ते 22 मे 2004

श्री. मनमोहन गुरूमित सिंग -

22 मे 2004 ते 26 मे 2014

श्री. नरेंद्र मोदी -

26 मे 2014 पासून कार्यरत.

Thursday, 7 April 2016

विविध खेळ व खेळाडूंची संख्या :

क्रिकेट - 11 खेळाडू

 फुटबॉल - 11 खेळाडू

 बास्केटबॉल - 5 खेळाडू

 बेसबॉल - 9 खेळाडू

 हॉकी - 11 खेळाडू

 पोलो - 4 खेळाडू

 रग्बी फुटबॉल - 15 खेळाडू

 व्हॉलीबॉल - 6 खेळाडू

 वॉटर पोलो - 7 खेळाडू

खेळांच्या मैदानाचे मोजमाप :

क्रिकेट : मैदान-गोलाकार व अंडाकृती, धावपट्टी (विकेटस) दोन स्टंपामधील अंतर 22 यार्ड, बॅट-जास्तीत जास्त लांबी 38 इंच, जास्तीतजास्त रुंदी 4.25 इंच, चेंडू-परीघ 8.81 ते 9 इंच, वजन 5.75 औंस, बळीचा व्यास 4.5 इंच.

 गोल्फ : चेंडू - 1.5 औंस, बळीचा व्यास 4.5 इंच.

 टेनिस कोर्ट : 78 फुट 28 फुट (सिंगल्स), 78 फुट 36 फुट (डबल्स).

 पोलो : मैदान 300 यार्ड्स 200 यार्डस.

 फुटबॉल : मैदान-लांबी 100 ते 130 यार्ड, रुंदी 50 ते 56 यार्ड, गोलची लांबी 8 यार्ड, उंची जमिनीपासून 8 फुट, रुंदी मागे 6 यार्ड, चेंडूचा परीघ 27 ते 28 इंच.

 बॅडमिंटन : कोर्ट 44 फुट लां. 17 (सिंगल्स), 44 फुट ल 20 फुट (डबल्स).

 बास्केटबॉल : 85 फुट लां. 46 फुट.

 बिलीयर्ड्स : टेबल 10 फुट ला. 5 फुट, टेबल उंची 3 फुट.

 हॉकी : मैदान 100 यार्ड 60 यार्ड, गोल-दोन खांबातील अंतर 8 यार्ड, उंची जमिनीपासून 7 फुट, चेंडू परीघ 8.81 वजन 5.75 औस.

 व्हॉलीबॉल : कोर्ट 30 फुट ल 30 फुट.

 टेबल टेनिस : टेबल 9 फुट ल 5 फुट, जमिनीपासून उंची 2.6 फुट.

 वॉटर पोलो : जलतरण तलाव - जास्तीत जास्त लांबी 19 फुट, जास्तीत जास्त रुंदी 20 फुट, जास्तीत जास्त रुंदी 20 फुट.

Wednesday, 6 April 2016

विविध खेळांचे भाग वा तुकडे :

क्रिकेट - इनिंग्ज

 शर्यत - लॅप्स

 टेनिस - सेट्स

 हॉकी - पिरियड्स

 बास्केटबॉल - हाड/हावज

 मुष्टियुद्ध - राऊंडस

 ब्रीज - गेम

 गोल्फ - हॉल्ट्स  

भारतीय संगीत व प्रसिद्ध कलाकार :

1. हिंदूस्थानी संगीत - या गायनातील प्रसिद्ध व्यक्ती :

परविन सुलताना

नयनादेवी

गिरीजा देवी

भीमसेन जोशी

गंगूबाई हनगल

विष्णू दिगंबर पलूस्कर

डागर बंधू

फैयाज खान

पंडित जसराज

2. कर्नाटकी संगीत - या गायनातील प्रसिद्ध व्यक्ती :

एम.एस. सुब्बालक्ष्मी

बाल मुरली कृष्ण

जी.एन. बालसुब्रमण्यम

एम.डी. रामनाथन

Tuesday, 5 April 2016

भारतीय वाद्य व वादक :

शहनाई     :-     बिस्मिल्ला खान, अली अहमद हुसेन

व्हायोलीन      :-    व्ही.जी.जोग,
गजाननराव जोशी, अरविंद
मफतलाल, प्रा. एल.सुब्रमण्यम, बालु स्वामीदिक्षित

सरोद       :-     उस्ताद अमजदअली खाँ, अल्ताउद्दीन खाँ, अलीअकबर खाँ, झरीन दारूवाला, हफिजखान

विना       :-     सदिक अली खाँ

तबला      :-       अहमद जाब तिरखाँ, अनोखेलाल, झाकीर हुसेन, पं.सामंत प्रसाद, चिन्ना बाबू, अल्लारखाँ, खामूमामा पर्वतका

संतूर      :-     पं. शिवकुमार शर्मा

सतार      :-     पं. रविशंकर, विलायत खान, बुधादिव्य मुखर्जी, मुस्ताफा अली खान, अब्दुल हलीम जाफरखान, निखिल बॅनर्जी, रहमखाँ

बासरी       :-      पन्नालाल घोष, हरिप्रसाद चौरसिया, एन, रामानी, टी. आर. महालिंगम.

सारंगी      :-     रामनारायण, रमेश मिश्रा, मोहम्मद आसिफ

भारतातील लोकनृत्यकला प्रकार :

राज्य                   नृत्यप्रकार

आंध्र प्रदेश       :-     कोम्मी, मथुरी

उत्तर प्रदेश       :-     नौटंकी, कजरी

बिहार             :-       विडेसिया

राजस्थान         :-      झुमर, खया गवाई, चामर-गिंदाद

पंजाब             :-       भांगडा, गिड्डा, झुमर

मिझोरम            :-       चिरावपंजाब

हरियाणा            :-       गिड्डा

जम्मू-कश्मीर        :-      चकी, हिकात, बचनगमा

मध्य प्रदेश            :-      पांडवानी, लोटा

हिमाचल प्रदेश        :-      सांगला, झांझर

मेघालय          :-        वायलालाहो

मणीपुर            :-    लाय हारोबा, पुंग                                                            चोलम

गुजरात            :-       रास-दांडिया, गरबा

आसाम            :-       बिहू, खुलीया, दोवधानी

बंगाल              :-        बाउल, रायबेरा

महाराष्ट्र            :-       लावणी, तमाशा

कर्नाटक             :-     भूतकोला, बलाकाट

Monday, 4 April 2016

प्रसिद्ध व्यक्तींची स्मृती स्थळे :

व्यक्तींची नावे       स्मृती स्थळाचे नाव    ठिकाण

महात्मा गांधी  :-  राजघाट  :-   दिल्ली

पंडित जवाहरलाल नेहरू   :-  शांतीवन   :-   दिल्ली

लाल बहाद्दूर शास्त्री   :-  विजयघाट   :-   दिल्ली

श्रीमती इंदिरा गांधी   :-  शक्तीस्थळ   :-   दिल्ली

राजीव गांधी   :-   वीरभूमी   :-   दिल्ली

चरणसिंग   :-   किसानघाट   :-   दिल्ली

जगजीवनराम   :-   समतास्थळ   :-   दिल्ली

मोरारजी देसाई   :-   अभयघाट   :-   अहमदाबाद

ज्ञानी झैलसिंग   :-   एकता स्थळ   :-   दिल्ली

डॉ. बाबासाहेब आंबेडकर   :-   चैत्यभूमी   :-   मुंबई

यशवंतराव चव्हाण   :-   प्रीतीसंगम   :-   कराड

नृत्य व संगीत क्षेत्रातील व्यक्ती  :

नृत्यप्रकार   राज्य  कलाकार

कथ्थक    :-    उत्तर प्रदेश   :-   बिरजू महाराज, गोपीकृष्ण, शंभू
महाराज, सितारादेवी, महाराज
कृष्णकुमार, रुची शर्मा, मंजिती दोव,
मोहनराव कल्याणपूरकर.

भरतनाट्यम    :-     तामिळनाडू    :-    मिनाक्षी सुंदरम, टी. बालसरस्वती,
इंद्राणी रेहमान, रुक्मिणीदेवी अरुंडेल, अलार्मेल वली, कृष्णमूर्ती, टी. के, महालिंगम.

कुचिपुडी    :-    आंध्रप्रदेश    :-    राजा रेड्डी, चिना सत्यम, राधा रेड्डी, वेदांतम सत्यनारायण शर्मा, वेदांत सत्यनारायण शर्मा, स्वप्नसुंदरी.   

मणीपुरी    :-    मणीपुर    :-    रिटा देवी, झवेरी भगिनी, उदयशंकर, सविता मेहता,

ओडीशी    :-    ओरिसा    :-    गुरु केलुचरण महापात्रा, माधवी मूदूगल, सोनल मानसिंग, संजुकता पाणिग्रही, मोहन महापत्रा, यामिनी कृष्णमूर्ती,

कथकली    :-    केरळ    :-    कुंज कुरूप, शांता राव, पांचाली, करुणाकर, गुरु गोपीनाथन, कृष्णन कुट्टी

नृत्य व संगीत क्षेत्रातील व्यक्ती  :

नृत्यप्रकार   राज्य  कलाकार

कथ्थक    :-    उत्तर प्रदेश   :-   बिरजू महाराज, गोपीकृष्ण, शंभू
महाराज, सितारादेवी, महाराज
कृष्णकुमार, रुची शर्मा, मंजिती दोव,
मोहनराव कल्याणपूरकर.

भरतनाट्यम    :-     तामिळनाडू    :-    मिनाक्षी सुंदरम, टी. बालसरस्वती,
इंद्राणी रेहमान, रुक्मिणीदेवी अरुंडेल, अलार्मेल वली, कृष्णमूर्ती, टी. के, महालिंगम.

कुचिपुडी    :-    आंध्रप्रदेश    :-    राजा रेड्डी, चिना सत्यम, राधा रेड्डी, वेदांतम सत्यनारायण शर्मा, वेदांत सत्यनारायण शर्मा, स्वप्नसुंदरी.   

मणीपुरी    :-    मणीपुर    :-    रिटा देवी, झवेरी भगिनी, उदयशंकर, सविता मेहता,

ओडीशी    :-    ओरिसा    :-    गुरु केलुचरण महापात्रा, माधवी मूदूगल, सोनल मानसिंग, संजुकता पाणिग्रही, मोहन महापत्रा, यामिनी कृष्णमूर्ती,

कथकली    :-    केरळ    :-    कुंज कुरूप, शांता राव, पांचाली, करुणाकर, गुरु गोपीनाथन, कृष्णन कुट्टी

Monday, 21 March 2016

महाराष्ट्र पठाराची निर्मिती

महाराष्ट्र पठाराची निर्मिती



महाराष्ट्र पठाराची निर्मिती ज्वालामुखीच्या
उद्रेकातून झाली.70 दशलक्ष वर्षापूर्वी -
भ्रंशमुलक उद्रेक झाला व लाव्हारसाचे
संचयन झाले. अशा प्रकारच्या अनेक
उद्रेकापासून महाराष्ट्र पठार तयार झाले. या
पठारावर अग्निजन्य खडक
आढळतात.भुपृष्टावर किंवा कमी खोलीवर
आढळणारे 'असिताश्म व कृष्णप्रस्तर' हे
दोन प्रकारचे खडक आढळतात.महाराष्ट्र
पठारावर उत्तरेकडून दक्षिणेकडे पुढील खोरी
आढळतात.

तापी-पूर्णा खोरे
गोदावरी खोरे
प्रणहिता खोरे
भीमा खोरे
कृष्णा खोरे

आर्कियन खडक :

हा अतिप्राचीन खडक पूर्व विदर्भा, चंद्रपुर,
भंडारा, गडचिरोली, नांदेड जिल्ह्याचा
पूर्वभाग आणि सिंधुदुर्गातील काही
तालुक्यांमध्ये आढळतो.
ग्रँनाईट, नीस व शिस्ट प्रकारच्या
खडकांपासून बनलेल्या या भुस्तरात लोह
खनिजांचे विपुल साठे आहेत.
धारवाड खडक : या श्रेणीच्या खडकांमध्ये
ग्रँन्जुलाईट्स
, डोलोमाईट, अभ्रक, सिलीमनाईट,
हॉर्नब्लेंड, शीष्ट, संगमरवर यांसारखी
मौल्यवान खनिजे आढळतात.
पूर्व नागपुर, भंडारा, गोंदिया, सिंधुदुर्ग व
कोल्हापूर जिल्ह्यातही धारवाड श्रेणीचे
खडक आढळतात.
पुणे, नागपुर, भंडारा, गोंदिया, सिंधुदुर्ग व
कोल्हापूर जिल्ह्यातही हा खडक आढळतो.
कडप्पा श्रेणींचा खडक : महाराष्ट्रातील
दक्षिण व पूर्व भागात हा खडक आढळतो.
कोल्हापूर जिल्ह्यात या श्रेणीतील खडकात
क्वार्टझाईट्स, शेल व चुनखडीचे खडक
आहेत.
 विंध्ययन खडक : विंध्ययन श्रेणीतील
खडक चंद्रपुर जिल्ह्यातच आढळतात.
हा खडक सुबक बांधकामासाठी उपयुक्त
असून दर्जेदार व टिकाऊ असतो.
गोंडवना खडक : अप्पर पॉलिओझाईक
नंतरच्या कालखंडात व्दीपखंडावर अनेक
बदल होऊ न दख्खनच्या पठारावर स्थानिक
पातळीवर हालचाली निर्माण झाल्या.
खोर्यांच्या आकाराचा खोलगट भाग निर्माण
होऊन तेथे नद्यांनी आणलेल्या गाळाचे
संचयन झाले.
कालांतराने त्यात प्राणी, वनस्पतीचे अवशेष
व जंगले गाडली गेली व त्याचे दगडी कोळशात
रूपांतर झाले.
त्याला 'गोंडवना खडक' असे म्हणतात.
चंद्रपुर, यवतमाळ, गडचिरोली व अमरावती
जिल्ह्यात अप्पर गोंडवना खडक आढळतात.

Saturday, 19 March 2016

सह्यांद्री चा पश्चिम घाट
जागतिक वारसा

२००६ साली भारताने यूनेस्को कडे पश्चिम
घाटाला जागतिक वारसा स्थानांमध्ये
समाविष्ट करण्यासाठी विनंती केली
आहे. यामध्ये एकंदर सात उपक्षेत्रे
असतील.
1. अगस्त्यमलाई उपक्षेत्र - यामध्ये
अगस्त्यमलाई संरक्षित जैविक क्षेत्र
(९०० वर्ग कि.मी.) ज्यामध्ये
तमिळनाडूतील कलक्कड मुंडणथुराई व्याघ्र
प्रकल्प (८०६ वर्ग कि.मी.) व नेय्यार
अभयारण्य , पेप्पारा तसेच शेंदुर्णीव
त्याच्या आसपास असणारे आचेनकोईलचे
क्षेत्र , थेन्मला, कोन्नी , पुनलुर ,
तिरुवनंतपुरम आणि अगस्त्यवनम, केरळ
यांचा समावेश आहे.
2. पेरियार उपक्षेत्र - यामध्ये केरळमधील
पेरियार राष्ट्रीय उद्यान (७७७ वर्ग
कि.मी.), रान्नी , कोन्नी व
आचनकोविल इथली जंगले. पूर्वेला
श्रीविल्लीपुत्तुर अभयारण्य व तिरुनवेली
इथली जंगले यांचा समावेश आहे.
3. अनामलाई उपक्षेत्र - यामध्ये चिन्नार
अभयारण्य , एराविकुलम राष्ट्रीय उद्यान
(९० वर्ग कि.मी.), इंदिरा गांधी राष्ट्रीय
उद्यान, ग्रास हिल्स राष्ट्रीय उद्यान व
करियन शोला राष्ट्रीय उद्यान (एकूण ९५८
वर्ग कि.मी.) तसेच तमिळनाडूमधील पलानी
पर्वतरांग राष्ट्रीय उद्यान (७३६.८७ वर्ग
कि.मी.) व केरळमधील परांबीकुलम अ
भयारण्य (२८५ वर्ग कि.मी.) यांचा
समावेश आहे. निलगिरी उपक्षेत्र - यामध्ये
निलगिरी संरक्षित जैविक क्षेत्र तसेच
करीम्पुझा राष्ट्रीय उद्यान (२३०
वर्ग कि.मी.), सायलंट व्हॅली राष्ट्रीय
उद्यान (८९.५२ वर्ग कि.मी.) व केरळमधील
वायनाड अभयारण्य (३४४ वर्ग कि.मी.)
आणि तमिळनाडूमधील बंदीपूर राष्ट्रीय
उद्यान (८७४ वर्ग कि.मी), मुकुर्थी
राष्ट्रीय उद्यान (७८.४६ वर्ग कि.मी.),
मुदुमलाई राष्ट्रीय उद्यान (३२१ वर्ग
कि.मी.) तसेच अमरांबलमचे संरक्षित जंगल
(६,००० वर्ग कि.मी.) यांचा समावेश आहे.
4. तळकावेरी उपक्षेत्र - यामध्ये ब्रह्मगिरी
अभयारण्य (१८१.२९ वर्ग कि.मी.), राजीव
गांधी राष्ट्रीय उद्यान (३२१ वर्ग कि.मी),
पुष्पगिरी अभयारण्य (९२.६५
वर्ग कि.मी.), कर्नाटकातील तळकावेरी
अभयारण्य (१०५.०१ वर्ग कि.मी.) व
केरळमधील आरळम संरक्षित
वनक्षेत्र यांचा समावेश आहे.
5. कुद्रेमुख उपक्षेत्र - यामध्ये कुद्रेमुख
राष्ट्रीय उद्यान (६००.३२ वर्ग कि.मी.),
सोमेश्वर अभयारण्य व आजूबाजूची
सोमेश्वरची संरक्षित जंगले तसेच
कर्नाटकातील अगुंबे व बलहल्ली येथील
जंगले यांचा समावेश आहे.
6. सह्याद्री उपक्षेत्र - यामध्ये आंशी
राष्ट्रीय उद्यान (३४० वर्ग कि.मी.),
चांदोली राष्ट्रीय उद्यान (३१७.६७
वर्ग कि.मी.), कोयना अभयारण्य व
राधानगरी अभयारण्य यांचा समावेश आहे.
7. प्राणीजगत पश्चिम घाटात हजारो प्रकारचे
प्राणी आढळतात. यामध्ये जवळजवळ ३२५
प्रजाती या जागतिक स्तरावर
नष्ट व्हायला आलेल्या प्रजाती आहेत.
तसेच उभयचरांमधील बऱ्याच प्रजाती या
फक्त पश्चिम घाटातच आढळतात.
सस्तन प्राणी: पश्चिम घाटात सस्तन
प्राण्यांच्या जवळपास १३९ प्रजाती
आढळतात. यापैकी मलबार
गंधमार्जार व सिंहपुच्छ वानर या
दोन प्रजाती विनाशाच्या मार्गावर आहेत.
पश्चिम घाटात आढळणाऱ्या सिंहपुच्छ
वानरांची संख्या तर फक्त २,५०० आहे.
सिंहपुच्छ वानरांची सर्वात जास्त संख्या ही
सायलंट व्हॅली राष्ट्रीय उद्यानात आढळते.
कुद्रेमुख राष्ट्रीय उद्यानात सुद्धा सिंहपुच्छ
वानरे आढळतात. ही पर्वतरांग वन्यजीवांसाठी
खूप उपयुक्त जागा आहे. निलगिरीचे जैविक
क्षेत्रामध्ये आशियाई हत्ती मोठ्या
प्रमाणावर आढळतात. ब्रह्मगिरी व
पुष्पगिरी अभयारण्येसुद्धा हत्तींसाठी
सुयोग्य निवासस्थान आहे. कर्नाटकातील
पश्चिम घाटात ६,००० पेक्षा जास्त हत्ती
आढळतात (२००४ सालातील गणनेप्रमाणे) व
भारतात सापडणाऱ्या वाघांपैकी १०% वाघ
सुद्धा इथेच आहेत.  . सुंदरबन नंतर भारतात
सर्वात जास्त वाघ हे कर्नाटक, तमिळनाडू व
केरळच्या जंगलातच आढळतात. बंदीपूर
राष्ट्रीय उद्यान व नागरहोल इथे ५,०००
पेक्षा जास्त गौर (बैल) कळप करून राहतात.
कोडागु जंगलांच्या पश्चिमेला निलगिरी
माकडे मोठ्या प्रमाणावर आढळतात. भद्रा
अभयारण्यात हरणांची मोठी संख्या आढळते.
बरेच हत्ती, गौर, सांबर , चित्ते, वाघ इ.
प्राणी केरळमधील जंगलांमध्ये आढळतात.
सरपटणारे प्राणी : अजगराच्या काही जाती
या फक्त पश्चिम घाटातच
आढळतात. उभयचर प्राणी : जगात
आढळणाऱ्या १७९ उभयचर प्राण्यांच्या
प्रजातींपैकी सुमारे ८०% प्रजाती या
फक्त पश्चिम घाटातच आढळतात.

Friday, 18 March 2016

महत्वाच्या घटना दुरुस्त्या

पहिली घटनादुरुस्ती (इ.स. १९५१) -

भारतीय राज्यघटनेत इ.स. १९५१ मध्ये
पहिली दुरुस्ती करण्यात आली. घटनेतील
पहिली दुरुस्ती एवढय़ापुरतेच तिचे महत्त्व
मर्यादित नाही. सर्वोच्च न्यायालयाने
दिलेल्या काही निकालांमुळे जमीन
सुधारणाविषयक कायद्यांच्या
अंमलबजावणीच्या मार्गात काही अडचणी
निर्माण झाल्या होत्या. त्या दूर करणे हा या
घटनादुरुस्तीचा मुख्य उद्देश होता. पहिल्या
घटनादुरुस्तीने राज्य घटनेच्या १९ व्या
कलमात बदल करण्यात आले. त्यानुसार
भाषण स्वातंत्र्य व अभिव्यक्ती स्वातंत्र्य
यांवर काही नवे र्निबध लादण्यात आले;
तसेच या दुरुस्तीने राज्यघटनेत ३१-अ आणि
३१-ब ही दोन नवी कलमे जोडण्यात आली.
सातवी घटनादुरुस्ती (इ.स. १९५६) -
भाषावर प्रांतरचना करण्याचा निर्णय
झाल्यानंतर राज्यपुनर्रचनेची योजना
अंमलात आणण्यासाठी इ.स. १९५६ मध्ये ही
घटनादुरुस्ती करण्यात आली. इ.स.
१९५६च्या राज्य पुनर्रचना कायद्याबरोबरच
ही घटनादुरुस्तीही संमत केली गेली.
स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारतीय
संघराज्यातील राज्यांचे 'अ', 'ब' आणि 'क'
अशा तीन प्रकारांत किंवा गटांत वर्गीकरण
करण्यात आले होते. या घटनादुरुस्तीने हे
वर्गीकरण रद्द ठरविण्यात आले आणि
संघराज्यातील सर्व घटकराज्यांना समान
दर्जा देण्यात आला. याशिवाय काही
केंद्रशासित (संघ)प्रदेश निर्माण करण्यात
आले. सातव्या घटनादुरुस्तीनंतर अस्तित्वात
आलेल्या घटकराज्यांची व केंद्रशासित
प्रदेशांची संख्या अनुक्रमे १४ व ६ इतकी
झाली. या घटनादुरुस्तीने आणखीही काही
महत्त्वाचे बदल घडवून आणले.
घटकराज्यांच्या विधानसभेची सभासद संख्या
जास्तीत जास्त ५०० व कमीत कमी ६० इतकी
असेल अशी व्यवस्था करण्यात आली. दोन
किंवा अधिक घटकराज्यांसाठी एकाच
राज्यपालाची नियुक्ती करणे, दोन किंवा
अधिक घटकराज्यांसाठी एकाच उच्च
न्यायालयाची स्थापना करणे, भाषिक
अल्पसंख्यांकाना संरक्षण मिळवून
देण्याविषयीची व्यवस्था करणे यांसारख्या
तरतुदीही या घटनादुरुस्तीअन्वये करण्यात
आल्या.

१७ वी घटनादुरुस्ती (इ.स. १९६४) -

ही घटनादुरुस्ती राज्यघटनेतील कलम
३१मधील मालमत्तेच्या हक्काशी संबंधित
आहे. पहिल्या व चौथ्या घटनादुरुस्तीअन्वये
या कलमात काही बदल करण्यात आले होते;
परंतु जमीन सुधारणाविषयक कायद्याची
अंमलबजावणी करण्यासाठी हे बदल पुरेसे
नाहीत, असे सरकारला वाटले. यानुसार
घटनेतील कलम '३१ अ' मधील 'मालमत्ता' या
शब्दाचा अर्थ व्यापक बनविण्यात आला.
त्याअंतर्गत रयतवारीतील जमिनी आणि
ज्यांच्या संदर्भात जमीन सुधारणा कायदे
केले आहेत अशा जमिनींचाही त्यात अंतर्भाव
करण्यात आला. याशिवाय घटनेच्या नवव्या
परिशिष्टात आणखी काही जमीन सुधारणा
कायद्यांचा समावेश करण्यात आला.

२४ वी घटनादुरुस्ती (इ.स. १९७१) -

या घटनादुरुस्तीने असे स्पष्ट करण्यात आले
की, घटनेच्या ३६८व्या कलमानुसार केलेल्या
दुरुस्तीला १३ व्या कलमातील कोणतीही
तरतूद लागू होणार नाही. तसेच या घटनेत
काहीही नमूद केलेले असले तरी ३६८व्या
कलमात नमूद केलेल्या प्रक्रियेनुसार
सुधारणा, बदल किंवा रद्द करण्याच्या
मार्गाने
या घटनेतील कोणतीही तरतूद दुरुस्त
करण्याचा संसदेला अधिकार असेल याचा
पुनरुच्चार करण्यात आला. या घटनादुरुस्तीने
केलेला आणखी एक महत्त्वाचा बदल म्हणजे
घटनादुरुस्ती विधेयकासंबंधी राष्ट्रपतीला
नकाराधिकार असणार नाही हे स्पष्ट
करण्यात आले. राष्ट्रपतींकडे पाठविलेल्या
घटनादुरुस्ती विधेयकावर राष्ट्रपतींना
स्वाक्षरी करावीच लागेल, अशी तरतूद
करण्यात आली.

४२ वी घटनादुरुस्ती (इ.स. १९७६) -

प्रामुख्याने सुवर्णसिंह समितीच्या
शिफारशीनुसार लागू करण्यात आली.
देशाच्या इतिहासात अत्यंत खळबळजनक
ठरलेली ४२वी घटनादुरुस्ती आहे. त्यातील
प्रमुख बाबी पुढीलप्रमाणे होत्या -
1. राज्य घटनेच्या उद्देशपत्रिकेत समाजवादी
व धर्मनिरपेक्ष हे दोन शब्द नव्याने
समाविष्ट केले.
2. मूलभूत कर्तव्याचे कलम ५१ए येथे घटनेत
प्रथमच समावेश करण्यात आले.
3. लोकसभा आणि विधानसभांचा कार्यकाल
पाच वर्षांवरून सहा वर्षांपर्यंत
वाढविण्यात आला.
4. मंत्रिमंडळाचा सल्ला राष्ट्रपतींवर
बंधनकारक केला.
5. मूलभूत हक्कापेक्षा मार्गदर्शक तत्त्वांना
अधिक महत्त्व दिले.
6. घटनेच्या ३६८ व्या कलमात दुरुस्ती केली.
घटनादुरुस्तीच्या संदर्भात संसदेचे
श्रेष्ठत्व प्रस्थापित करण्यात आले.
४४ वी घटनादुरुस्ती (इ.स. १९७८) -
१) ४२ व्या घटनादुरुस्तीमधील वादग्रस्त भाग दूर
करणे हा या घटनादुरुस्तीचा उद्देश होता. २)
संपत्तीचा हक्का हा मूलभूत हक्कांतून
वगळण्यात आला. ३) लोकसभेचा व
विधानसभेचा कार्यकाल पुन्हा पाच वर्षांचा
करण्यात आला. ४) ३५२ कलमात अंतर्गत
गोंधळ हा शब्द काढून टाकून त्याऐवजी
सशस्त्र उठाव, युद्ध किंवा बाह्य आक्रमणे
यासाठी आणीबाणी जाहीर करण्यात येईल
असे जाहीर करण्यात आले.

५२ वी घटनादुरुस्ती (इ.स. १९८५) -

पक्षांतराच्या वाढत्या प्रमाणावर बंधने
घालण्याच्या दृष्टीने ही घटनादुरुस्ती केली.
पक्षांतरबंदी विधेयक संमत झाले.
राजकारणातील पक्षांतराच्या प्रवृत्तीवर
नियंत्रण ठेवण्याच्या उद्देशाने पंतप्रधान
राजीवब गांधी सत्तेवर आल्याबरोबर ही
घटनादुरुस्ती झाली. याच घटनादुरुस्तीने
घटनेला दहावे परिशिष्ट जोडले.

६१ वी घटनादुरुस्ती (इ.स. १९८९) -

या घटनादुरुस्तीन्वये घटनेच्या ३२६ व्या
कलमात दुरुस्ती करण्यात आली. ही दुरुस्ती
मतदानाचा अधिकार प्राप्त होण्यासाठी पूर्ण
करावयाच्या वयोमर्यादेच्या अटीबाबत होती.
राज्य घटनेतील मूळ तरतुदीनुसार वयाची २१
वष्रे पूर्ण झालेल्या प्रत्येक भारतीय
नागरिकाला लोकसभा व राज्य विधानसभा
यांच्या निवडणुकांसाठी मतदानाचा हक्क
देण्यात आला होता. या घटनादुरुस्तीने
वयोमर्यादेची अट २१ वर्षांवरून १८
वर्षांपर्यंत खाली आणली; त्यामुळे आता
वयाची १८ वष्रे पूर्ण झालेल्या प्रत्येक
भारतीय नागरिकाला मतदानाचा अधिकार
प्राप्त झाला आहे.

७३ वी घटनादुरुस्ती (इ.स. १९९३) -

अलीकडील काळातील बहुचíचत
घटनादुरुस्त्यांपकी ही एक घटनादुरुस्ती होय.
पंचायत राज संस्थांना किंवा ग्रामीण
स्थानिक स्वराज्य संस्थांना घटनात्मक
दर्जा मिळवून देण्याचे कार्य तिने केले आहे.
७३ व्या घटनादुरुस्तीन्वये राज्यघटनेत
'पंचायती' या शीर्षकाखाली भाग ९ या नव्या
भागाचा अंतर्भाव करण्यात आला; तसेच
कलम २४३ ते २४३-ओ अशी सोळा नवी कलमे
समाविष्ट करण्यात आली. याशिवाय
परिशिष्ट ११ हे नवे परिशिष्टही जोडण्यात
आले. या घटनादुरुस्तीने पंचायत राजची
स्थापना ही आता राज्यांची 'घटनात्मक
जबाबदारी' बनली आहे. घटनेच्या ११व्या
परिशिष्टात पंचायतीच्या अधिकारक्षेत्रात
येणाऱ्या २९ विषयांचा तपशील दिला आहे.

७४ वी घटनादुरुस्ती (इ.स. १९९३) -

७४ वी घटनादुरुस्ती नागरी स्थानिक
स्वराज्य संस्थांशी निगडित आहे.
त्र्याहत्तराव्या घटनादुरुस्तीप्रमाणेच या
घटनादुरुस्तीचा उद्देशही स्थानिक स्वराज्य
संस्था सक्षम बनविणे आणि त्यांना आणखी
अधिकार प्रदान करणे हा आहे.
चौऱ्याहत्तराव्या घटनादुरुस्तीअन्वये
'नगरपालिका' या शीर्षकाखाली भाग ९-अ हा
नवा भाग समाविष्ट करण्यात आला.
त्यामध्ये २४३-पी ते २४३-झेड जी अशी
कलमे आहेत. याखेरीज घटनेस नवे १२ वे
परिशिष्टही जोडण्यात आले आहे. या
घटनादुरुस्ती कायद्यात नगरपंचायत,
नगरपरिषद आणि महानगरपालिका अशा तीन
प्रकारच्या नागरी स्थानिक स्वराज्य संस्था
स्थापन करण्याबाबतची तरतूद आहे. तसेच
राज्यांनी या संस्थांची स्थापना करणे
बंधनकारक ठरविण्यात आले आहे.
नगरपालिकांची रचना, त्यांचा कार्यकाल,
निवडणुका, जागांचे आरक्षण, अधिकार व
काय्रे, वित्त आयोगाची स्थापना इत्यादी
तरतुदी या भागात करण्यात आल्या आहेत.
याशिवाय घटनेच्या बाराव्या परिशिष्टात
नगरपालिकांच्या अखत्यारित येणाऱ्या १८
विषयांची माहिती देण्यात आली आहे.

८६ वी घटनादुरुस्ती (इ.स. २००२) -

या घटनादुरुस्तीने घटनेच्या २१व्या कलमात
२१-अ हे नवे कलम जोडण्यात आले.
त्यानुसार सहा ते १४ या वयोगटातील
मुलांसाठी शिक्षणाचा हक्क हा मूलभूत हक्क
म्हणून समाविष्ट करण्यात आला; त्यामुळे
वरील वयोगटातील मुलांना सक्तीचे व मोफत
शिक्षण देणे ही राज्याची जबाबदारी बनली
आहे.

९२ वी घटनादुरुस्ती (इ.स. २००३) -

या घटनादुरुस्तीने राज्य घटनेच्या आठव्या
परिशिष्टात बदल करण्यात आला. या
परिशिष्टात घटनेने मान्यता दिलेल्या अधिकृत
भाषांचा समावेश करण्यात आला आहे. या
घटनादुरुस्तीने बोडो, डोग्री, मथिली व
संथाली या आणखी चार भाषांना अधिकृत
भाषा म्हणून मान्यता दिली; त्यामुळे आठव्या
परिशिष्टातील अधिकृत भाषांची संख्या आता
२२ इतकी झाली आहे.

९३ वी घटनादुरुस्ती (इ.स. २००६) -

या घटनादुरुस्तीअन्वये अनुसूचित जाती-
जमाती व इतर मागासवर्गीयांसाठी अनुदानित
किंवा विनाअनुदानित खासगी शिक्षण
संस्थांसह शैक्षणिक संस्थांमधील
प्रवेशासंबंधी कोणतीही विशेष तरतूद
करण्यास राज्याला प्रतिबंध असणार नाही,
अशी तरतूद करण्यात आली. या
घटनादुरुस्तीनुसार अनुसूचित जाती-जमाती व
इतर
मागासवर्गीयांसाठी खासगी शिक्षण
संस्थांमध्ये राखीव जागा ठेवण्याची तरतूद
करण्यास राज्यास आडकाठी करता येणार
नाही.

११० वी घटनादुरुस्ती (इ.स. २००९) -

२६ नोव्हेंबर २००९ रोजी ११० घटनादुरुस्ती विधेयक
लोकसभेत मांडण्यात आले. या विधेयकान्वये घटनेतील
कलम २४३ ड मध्ये दुरुस्ती प्रस्तावित असून पंचायत
संस्थांमध्ये स्त्री-प्रतिनिधींसाठी असलेले एकतृतीयांश
आरक्षण आता किमान ५० टक्क्यांपर्यंत वाढवणे
नियोजित आहे.