राज्यसेवा पूर्व सराव पेपर क्र.1 :
1. काँग्रेस स्थापनेसंदर्भातील 'सुरक्षा झडप सिद्धांता' ला 'दंतकथा' संबोधून कोणी नाकारले आहे?
ए.ओ. हयूम ए.आर. देसाई तारचंद बीपन चंद्र
उत्तर : बीपन चंद्र
2. खालीलपैकी कोणता क्रांतिकारक विचाराने नास्तिक व समाजवादी होता?
दामोदर चाफेकर विनायक दामोदर सावरकर अरविंद घोष भगत सिंग
उत्तर : भगत सिंग
3. आरंभकालीन राष्ट्रवाद्यांनी 20 व्या शतकातील स्वातंत्र्य चळवळीसाठी भक्कम पाया घातला :
अर्जविनंत्यांच्या राजकारणाव्दारे घटनात्मक साधनांव्दारे आंदोलनात्मक मार्गाव्दारे वसाहतवादाच्या आर्थिक समीक्षेव्दारे
उत्तर : वसाहतवादाच्या आर्थिक समीक्षेव्दारे
4. गंगेच्या मैदानी प्रदेशाने भारतातील ----- टक्के लोक सामावून घेतले आहेत.
13 23 33 43
उत्तर : 23
5. तीज हा हिंदू सण खालीलपैकी कोणत्या देवतेस समर्पित केला जातो?
लक्ष्मी सरस्वती पार्वती दुर्गा
उत्तर : पार्वती
6. चेन्नईजवळ 'एन्नोर' हे बंदर नव्याने विकसित झाले आहे, हे देशातील ----- वे मोठे बंदर असून पूर्व किनार्यावरील ----- वे मोठे बंदर आहे.
6 व 12 8 व 20 12 व 6 4 व 9
उत्तर : 12 व 6
7. खालीलपैकी कोणती टेकडी पूर्व आणि पश्चिम घाटास जोडते?
बिलीगिरी निलगिरी निमगिरी नल्लामाला
उत्तर : निलगिरी
8. मानवी शरीरामध्ये पार्याच्या संचयनामुळे ----- हा आजार होतो.
इटाई-इटाई मिथोनोग्लोबिनीमिया मिनामाटा पोलियो
उत्तर : मिनामाटा
9. अन्नसाखळीमध्ये प्रत्येक ऊर्जास्तरावर विषारी पदार्थांच्या प्रमाणात सलग होणार्या वाढीस ----- म्हणतात.
जैवनिम्नीकरण जैवआवर्धन जैवसंचयन जैवउपचारीकरण
उत्तर : जैवआवर्धन
10. कोणत्या वायुमुळे मुख्यत्वे ओझोन थराचा र्हास होतो?
कार्बन डायऑक्साईड नायट्रोजन डायऑक्साईड मिथेन क्लोरो फ्ल्यूरो कार्बन
उत्तर : क्लोरो फ्ल्यूरो कार्बन
11. भारतातील सर्वात पहिले राष्ट्रीय उद्यान ----- हे होय.
जिम कोर्बेट संजय गांधी गीर कान्हा
उत्तर : जिम कोर्बेट
12. खालीलपैकी कोणते वर्ष हे भारतातील पर्यावारणासंबंधी वैधानिक कारवाईसाठी एक महत्वाची खून म्हणून मानले जाते; जेव्हा राष्ट्रीय पर्यावरण नियोजन आणि समन्वय समितीची स्थापना झाली?
1973 1971 1972 1974
उत्तर : 1972
13. वृक्क सामू नियंत्रित कशाच्या मदतीने करतात?
गळणमध्ये H+ions मिळवून रक्तामधून H+ions काढून Ca+ आणि Na+ions रक्तामध्ये विरघळवून C+ions रक्तामधून काढून
उत्तर : रक्तामधून H+ions काढून
14. रेडिओ तरंगाचा वेग हा ----- असतो.
प्रकाशाच्या वेगापेक्षा जास्त प्रकाशाच्या वेगाएवढाच प्रकाशाच्या वेगापेक्षा कमी प्रकाशाच्या वेगाच्या दोन पट
उत्तर : प्रकाशाच्या वेगाएवढाच
15. 2011 च्या जनगणनेप्रमाणे भारतातील किती शहरांची लोकसंख्या 10 लाखापेक्षा जास्त आहे?
52 53 54 55
उत्तर : 53
16. 2011 च्या जनगणनेनुसार 2001 ते 2011 दरम्यानची स्त्री, साक्षरता दारातील वाढ खालीलपैकी किती होती?
53.7% ते 65.5% 54.1% ते 67.2% 52.3% ते 64.4% 55.3% ते 63.2%
उत्तर : 53.7% ते 65.5%
17. वनस्पतींमध्ये कोणते विकर जास्त प्रमाणात आढळते?
बिटा गॅलॅक्टोसाईडेज आर.यू.बी.पी. कारबॉक्सीलेज एंटेरोकायनेज हिटेरोकायनेज
उत्तर : आर.यू.बी.पी. कारबॉक्सीलेज
18. ऑक्सिश्वसनाच्या शेवटी काय तयार होते?
CO२+CO CO२+NO CO२+O२ CO२+H२O
उत्तर : CO२+H२O
19. 2000 सालच्या राष्ट्रीय लोकसंख्या धोरणाचे दीर्घकालीन उद्दीष्ट स्थिर लोकसंख्या साध्य करणे आहे. खालीलपैकी कोणत्या वर्षात हे उद्दीष्ट साध्य करावयाचे आहे?
2015 2025 2035 2045
उत्तर : 2045
20. खालील पर्यायातून 'माल्थसचा लोकसंख्येचा सापळा' ज्याच्याशी संबंधित आहे तो पर्याय निवडा.
लोकसंख्या वाढ आणि सकारात्मक नियंत्रण लोकसंख्या वाढ आणि प्रतीबंधात्मक नियंत्रण लोकसंख्या वाढ आणि विकास लोकसंख्या वाढ आणि जननक्षमता
उत्तर : लोकसंख्या वाढ आणि विकास