खनिजद्रव्य व त्याचे उपयोग :
शरीरातील प्रक्रियेचे नियंत्रण व संरक्षण करण्याकरिता शरीराला खनिजाची गरज असते. आपल्या शरीराची निगा राखण्यामध्ये खालील खनिजे महत्वाचे आहेत.
खनिज - फॉस्फरस -
उपयोग - हाडे व स्नायू यांच्या संवर्धनासाठी ए.टी.पीची निर्मितीकरण्याकरिता
अभावी होणारे परिणाम - हाडे ठिसुळ होतात, चयापचय क्रियेत अडथळे निर्माण होतात
स्त्रोत - अन्नधान्ये, दुग्धजन्यपदार्थ मेथी, हिरव्या पालेभाज्या
खनिज - पोटॅशियम-
उपयोग - चेतापेशीच्या पोषणाकरिता
अभावी होणारे परिणाम - चेतापेशीवर परिणाम होतो
स्त्रोत - सुकी फळे
खनिज - कॅल्शियम-
उपयोग - हाडे, दात, रक्त, मज्जातंतू व हृदय यांच्या पोषणाकरिता
अभावी होणारे परिणाम - हाडे कामकूवत व नरम होतात. कॅल्शियमच्या अभावी ऑस्टीओमॅलेशिया हा विकार होतो.
स्त्रोत - तीळ व पालेभाज्या
खनिज - लोह-
उपयोग - रक्त संवर्धन व हिमोग्लोबिनच्या पोषणाकरिता, ऑक्सीजन व हिमोग्लोबीन याचा संयोग घडवून आणते व प्रतिरोध संस्थेला मदत करते.
अभावी होणारे परिणाम - लोहाच्या कमतरतेचा परिणाम हिमोग्लोबिनवर होतो. लोहाच्या अभावी रक्तक्षय व पंडूरोग होतो.
स्त्रोत - हिरव्या पालेभाज्या व मेथीची भाजी
खनिज - तांबे-
उपयोग - हिमोग्लोबिनचे संवर्धन करणे
अभावी होणारे परिणाम - तांब्याच्या आभावी हिमोग्लोबिनची निर्मिती होत नाही.
स्त्रोत - पालेभाज्या
खनिज - सल्फर-
उपयोग - प्रथिनांची निर्मिती करणे अस्थी व नखे यांचे आरोग्य
अभावी होणारे परिणाम - केस, हाडे कमकूवत होतात
खनिज - फ्लोरिन-
उपयोग - दातांचे रक्षण करण्याकरिता,
अभावी होणारे परिणाम - याच्या अभावी दंतक्षय होतो.
खनिज - सोडीयम-
उपयोग - रक्तामधील आम्ल व अल्क यांचा समतोल साधला जातो.
अभावी होणारे परिणाम - रक्तदाबावर परिणाम होतो.
खनिज - आयोडीन -
उपयोग - थायराईड ग्रथीच्या पोषणाकरिता
अभावी होणारे परिणाम - गलगंड नावाचा आजार होतो.