Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu
Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu

Wednesday, 12 October 2016

हेलियम

 हेलियम 


• नाव, चिन्ह, अणुक्रमांक- हेलियम, He, 2

दृश्यरू , परंगहीन वायू

रासायनिक श्रेणी निष्क्रीय वायू

• अणुभार- 4.002602ग्रॅ·मोल −१

• भौतिक गुणधर्म स्थिती- वायू

हेलियम हा एक रंगहीन, गंधहीन, चवरहीत, बिनविषारी, उदासीन वायू आहे. हेलियम हे २ अणूक्रमांकाचे रासायनिक मूलद्रव्य आहे.

हेलियमचा वितळण्याचा आणि वायूरूप होण्याचा बिंदु सर्व मूलद्रव्यात सर्वात कमी आहे. अतिशय पराकोटीच्या कमी तपमानाचा अपवाद सोडता हेलियम नेहेमी वायूरूपातच सापडतो.


हेलियमचा शोध ऑगस्ट १८ , इ.स. १८६८ रोजी सूर्याच्या क्रोमोस्फियरच्या लहरींचा पटलातील गडद पिवळ्या रेघेवरून लागला. हेलियमचे नामकरण हे ग्रीक भाषेतील ἥλιος (हेलियॉस ) अशा सूर्य ह्या अर्थी शब्दावरूनच करण्यात आले आहे.


• सिंधुदुर्गातील विजयदुर्ग-जसा शिवरायांच्या इतिहासाचा साक्षीदार, तसाच तो हेलियम वायूच्या शोधाचा साक्षीदार आहे. १८ ऑगस्ट १८६८ रोजी ब्रिटिश खगोलशास्त्रज्ञ सर नॉर्मन लॉकियर यांनी याच किल्ल्यावरुन, हेलियमचा शोध लावला होता . विजयदुर्गावर मुक्कामी असतांना, सूर्याभोवती असणा-या पिवळ्या रंगाच्या रेषा म्हणजेच हेलियम वायु असल्याचा शोध लॉकियर यांनी लावला. त्यामुळेच १८ ऑगस्ट हा 'हेलियम डे' म्हणून जगभरात साजरा केला जातो. हेलियमच्या जन्माचे ठिकाण म्हणून विजयदुर्गचे नाव जगभर प्रसिद्ध आहे.