Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu
Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu

Saturday, 19 March 2016

भूगोल प्रश्नसंच भाग 2 :

1. समान तापमान असणार्‍या बिंदुना जोडणार्‍या काल्पनिक रेषेला ----- रेषा म्हणतात.

 समभार समपर्जन्य समताप समोच्चता

उत्तर : समोच्चता

2. विषुववृत्तीय वनात ----- वृक्ष आढळतो.

 महोगनी साग पळस खैर

उत्तर : महोगनी

3. ----- वंशाचे लोक मध्य व पूर्व आशियात आढळतात.

 निग्राईड मांगोलाईड बुश मॅनाईड ऑस्ट्रेलॉईड

उत्तर : मांगोलाईड

4. ----- हा उत्तर अमेरिका आणि दक्षिण अमेरिका यांना जोडणारा महामार्ग आहे.

 ट्रान्स कॅनेडियन हायवे ग्रँड ट्रंक महामार्ग पॅन अमेरिकन महामार्ग स्टुअर्ट महामार्ग

उत्तर : पॅन अमेरिकन महामार्ग

5. सुएझ कालवा मार्ग अतिशय महत्वाचा आहे, कारण -----

 तो समुद्रसपाटीवर आहे तो मुंबई व लंडनला जोडतो ह्यामुळे वेळ व अंतर वाचते हा खाजगी कालवा आहे.

उत्तर : ह्यामुळे वेळ व अंतर वाचते

6. सर्व प्रकारच्या विकासात ----- हा केंद्रबिंदु असतो.

 प्रदेश मानव निसर्ग वाहतूक

उत्तर : मानव

7. लोह आणि पोलाद उद्योगधंदे ----- जवळ स्थापन होतात.

 कोळसा उत्पादक प्रदेश पानी पुरवठा प्रदेश बाजारपेठ विद्युत केंद्र

उत्तर : कोळसा उत्पादक प्रदेश

8. भूकंप होण्याची कारणे कोणती?

 जमीन आकुंचन व प्रसरण पावते सुप्त ज्वालामुखी जागृत होतो भूगर्भातील पाण्याचे बाष्प होते यापैकी नाही

उत्तर : यापैकी नाही

9. नॅरोगेज या मार्गातील दोन रुळातील अंतर किती से.मी. असते?

 676 776 576 876

उत्तर : 776

10. खालीलपैकी कोणती जमीन कापसाची जमीन म्हणून ओळखली जाते?

 गाळाची जमीन काळी जमीन तांबडी जमीन रेताड जमीन

उत्तर : काळी जमीन

11. भारताला ----- किलोमीटर लांबीची भुसीमा लाभलेली आहे?

 14300 15200 16500 15000

उत्तर : 15200

12. मीठागरांचा जिल्हा कोणता?

 रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड ठाणे

उत्तर : रायगड

13. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे?

 मुंबई मुंबई उपनगर रायगड रत्नागिरी

उत्तर : मुंबई उपनगर

14. कोणत्या दोन दिशांदरम्यान 'समझोता एक्सप्रेस' कोणत्या दोन देशादरम्यान धावते?

 भारत-पाकिस्तान भारत-चीन भारत-बांग्लादेश भारत-नेपाळ

उत्तर : भारत-पाकिस्तान

15. चपराळा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे?

 भंडारा गोंदिया गडचिरोली सातारा

उत्तर : गडचिरोली

16. शेकरू प्राण्यांसाठी प्रसिद्ध अभयारण्य कोणते?

 चपराळा अभयारण्य भीमाशंकर अभयारण्य पेंच अभयारण्य मेळघाट अभयारण्य

उत्तर : भीमाशंकर अभयारण्य

17. ----- ही वर्धा नदीची उपनदी आहे?

 पेनगंगा   भीमा येरळा पंचगंगा

उत्तर : पेनगंगा  

18. खजुराहो कोणत्या राज्यात आहे?

 उत्तर प्रदेश मध्यप्रदेश महाराष्ट्र ओरिसा

उत्तर : मध्यप्रदेश

19. महाराष्ट्रात रब्बी पिके कोणत्या ऋतूत घेतली जातात?

 पावसाळा उन्हाळा मोसमी हिवाळा

उत्तर : हिवाळा

20. महाराष्ट्रातील सर्वात जास्त अवर्षणग्रस्त जिल्हा कोणता?

 भंडारा अहमदनगर कोल्हापूर पुणे

उत्तर : अहमदनगर