Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu
Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu

Tuesday, 24 March 2020

Questions And Answer About COVID-19

                                   Stay healthy and Safe



















Wednesday, 28 March 2018

                सह्याद्री पश्चिम घाट


                                                जागतिक वारसा

२००६ साली भारताने यूनेस्को कडे पश्चिम घाटाला जागतिक वारसा स्थानांमध्ये समाविष्ट करण्यासाठी विनंती केली आहे. यामध्ये एकंदर सात उपक्षेत्रे असतील.

  1. अगस्त्यमलाई उपक्षेत्र - यामध्ये अगस्त्यमलाई संरक्षित जैविक क्षेत्र (९०० वर्ग कि.मी.) ज्यामध्ये तमिळनाडूतील कलक्कड मुंडणथुराई व्याघ्र प्रकल्प (८०६ वर्ग कि.मी.) व नेय्यार अभयारण्य  , पेप्पारा तसेच शेंदुर्णीव त्याच्या आसपास असणारे आचेनकोईलचे क्षेत्र , थेन्मला, कोन्नी  , पुनलुर , तिरुवनंतपुरम आणि अगस्त्यवनम, केरळ यांचा समावेश आहे.
  2. पेरियार उपक्षेत्र - यामध्ये केरळमधील पेरियार राष्ट्रीय उद्यान (७७७ वर्ग कि.मी.), रान्नी , कोन्नी व आचनकोविल इथली जंगले. पूर्वेला श्रीविल्लीपुत्तुर अभयारण्य व तिरुनवेली इथली जंगले यांचा समावेश आहे.
  3. अनामलाई उपक्षेत्र - यामध्ये चिन्नार अभयारण्य , एराविकुलम राष्ट्रीय उद्यान (९० वर्ग कि.मी.), इंदिरा गांधी राष्ट्रीय उद्यान, ग्रास हिल्स राष्ट्रीय उद्यान व करियन शोला राष्ट्रीय उद्यान (एकूण ९५८ वर्ग कि.मी.) तसेच तमिळनाडूमधील पलानी पर्वतरांग राष्ट्रीय उद्यान (७३६.८७ वर्ग कि.मी.) व केरळमधील परांबीकुलम अ भयारण्य (२८५ वर्ग कि.मी.) यांचा समावेश आहे. निलगिरी उपक्षेत्र - यामध्ये निलगिरी संरक्षित जैविक क्षेत्र तसेच करीम्पुझा राष्ट्रीय उद्यान (२३० वर्ग कि.मी.), सायलंट व्हॅली राष्ट्रीय उद्यान (८९.५२ वर्ग कि.मी.) व केरळमधील वायनाड अभयारण्य (३४४ वर्ग कि.मी.) आणि तमिळनाडूमधील बंदीपूर राष्ट्रीय उद्यान (८७४ वर्ग कि.मी), मुकुर्थी राष्ट्रीय उद्यान (७८.४६ वर्ग कि.मी.), मुदुमलाई राष्ट्रीय उद्यान (३२१ वर्ग कि.मी.) तसेच अमरांबलमचे संरक्षित जंगल (६,००० वर्ग कि.मी.) यांचा समावेश आहे.
  4. तळकावेरी उपक्षेत्र - यामध्ये ब्रह्मगिरी अभयारण्य (१८१.२९ वर्ग कि.मी.), राजीव गांधी राष्ट्रीय उद्यान (३२१ वर्ग कि.मी), पुष्पगिरी अभयारण्य (९२.६५ वर्ग कि.मी.), कर्नाटकातील तळकावेरी अभयारण्य (१०५.०१ वर्ग कि.मी.) व केरळमधील आरळम संरक्षित वनक्षेत्र यांचा समावेश आहे.
  5. कुद्रेमुख उपक्षेत्र - यामध्ये कुद्रेमुख राष्ट्रीय उद्यान (६००.३२ वर्ग कि.मी.), सोमेश्वर अभयारण्य व आजूबाजूची सोमेश्वरची संरक्षित जंगले तसेच कर्नाटकातील अगुंबे व बलहल्ली येथील जंगले यांचा समावेश आहे.
  6. सह्याद्री उपक्षेत्र - यामध्ये आंशी राष्ट्रीय उद्यान (३४० वर्ग कि.मी.), चांदोली राष्ट्रीय उद्यान (३१७.६७ वर्ग कि.मी.), कोयना अभयारण्य व राधानगरी अभयारण्य यांचा समावेश आहे.
  7. प्राणीजगत पश्चिम घाटात हजारो प्रकारचे प्राणी आढळतात. यामध्ये जवळजवळ ३२५ प्रजाती या जागतिक स्तरावर नष्ट व्हायला आलेल्या प्रजाती आहेत. तसेच उभयचरांमधील बऱ्याच प्रजाती या फक्त पश्चिम घाटातच आढळतात.

सस्तन प्राणी: पश्चिम घाटात सस्तन प्राण्यांच्या जवळपास १३९ प्रजाती आढळतात. यापैकी मलबार
गंधमार्जार व सिंहपुच्छ वानर या दोन प्रजाती विनाशाच्या मार्गावर आहेत. पश्चिम घाटात आढळणाऱ्या सिंहपुच्छ वानरांची संख्या तर फक्त २,५०० आहे. सिंहपुच्छ वानरांची सर्वात जास्त संख्या ही सायलंट व्हॅली राष्ट्रीय उद्यानात आढळते. कुद्रेमुख राष्ट्रीय उद्यानात सुद्धा सिंहपुच्छ वानरे आढळतात.ही पर्वतरांग वन्यजीवांसाठी खूप उपयुक्त जागा आहे. निलगिरीचे जैविक क्षेत्रामध्ये आशियाई हत्ती मोठ्या प्रमाणावर आढळतात. ब्रह्मगिरी व पुष्पगिरी अभयारण्येसुद्धा हत्तींसाठी सुयोग्य निवासस्थान आहे. कर्नाटकातील पश्चिम घाटात ६,००० पेक्षा जास्त हत्ती आढळतात (२००४ सालातील गणनेप्रमाणे) व भारतात सापडणाऱ्या वाघांपैकी १०% वाघ सुद्धा इथेच आहेत.  . सुंदरबन नंतर भारतात सर्वात जास्त वाघ हे कर्नाटक, तमिळनाडू व केरळच्या जंगलातच आढळतात. बंदीपूर राष्ट्रीय उद्यान व नागरहोल इथे ५,००० पेक्षा जास्त गौर (बैल) कळप करून राहतात. कोडागु जंगलांच्या पश्चिमेला निलगिरी माकडे मोठ्या प्रमाणावर आढळतात. भद्रा अभयारण्यात हरणांची मोठी संख्या आढळते. बरेच हत्ती, गौर, सांबर , चित्ते, वाघ इ. प्राणी केरळमधील जंगलांमध्ये आढळतात.

सरपटणारे प्राणी :अजगराच्या काही जाती या फक्त पश्चिम घाटातच आढळतात. उभयचर प्राणी : जगात आढळणाऱ्या १७९ उभयचर प्राण्यांच्या प्रजातींपैकी सुमारे ८०% प्रजाती या फक्त पश्चिम घाटातच आढळतात. 

Thursday, 4 May 2017

संयुक्त महाराष्ट्र चळवळ

संयुक्त महाराष्ट्र चळवळ
स्वतंत्र भारतात मराठी भाषकांचे राज्य स्थापन करण्यासाठी संयुक्त महाराष्ट्र चळवळ हा लढा उभारला गेला. या चळवळीमुळे १ मे इ. स. १९६० रोजी महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आले.
महाराष्ट्र राज्यात मराठी भाषा बोलणारे मुंबई, कोकण, देश, विदर्भ, मराठवाडा, खानदेश व अजूनही महाराष्ट्राबाहेरच असलेले डांग, बेळगाव, निपाणी, कारवार व बिदर हे भाग अभिप्रेत होते. साहित्यिक, सांस्कृतिक, वैचारिक, राजकीय या सर्व अंगानी ही चळवळ उभी राहिली.
 पूर्वार्ध 
                      ब्रिटिशांनी आपल्या राज्यकारभारासाठी भारताची विभागणी वेगवेगळ्या प्रांतात केली होती परंतु ती भाषेप्रमाणे नव्हती. इ. स. १९२० रोजी नागपुरात झालेल्या काँग्रेस अधिवेशनाच्या वेळी भाषावर प्रांतरचेनेचा मुद्दा महात्मा गांधींनी मान्य केला होता.लोकमान्य टिळक हे देखील भाषावर प्रांतरचनेच्या बाजूने होते. काँग्रेसनेच एकेकाळी मान्य केलेला हा मुद्दा स्वातंत्र्यानंतर मात्र पक्षाला ,विशेषत: नेहरुंना , संकुचित व राष्ट्रीय एकात्मकतेला धोका वाटू लागला.मुंबईतील भांडवलदारांना जे मुख्यत: अमहाराष्ट्रीय होते, त्यांचा मुंबई महाराष्ट्राला द्यायला कडाडून विरोध होता.संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचा पाया इ. स. १९३८ च्या अखेर वऱ्हाडात घातला गेला. त्या वेळी वऱ्हाडचा प्रदेश जुन्या मध्यप्रांत व वऱ्हाड (सी. पी. अँड बेरार प्रॉव्हिन्स) प्रांतात समाविष्ट होता. त्यात बहुसंख्या हिंदी भाषिकांची होती. वऱ्हाडातून येणारे उत्पन्न अधिकतर हिंदी विभागावर खर्च होऊनही वऱ्हाड दुर्लक्षिलेला राही.त्यामुळे त्यातून मराठी वऱ्हाड वेगळा करण्याची मागणी चालू शतकाच्या प्रारंभीपासून व्हाइसरॉयच्या कौन्सिलात होत होती. इ. स. १९३५ साली प्रांतिक स्वायत्ततेचा कायदा पास झाला.इ. स. १९३७च्या निवडणुकीत प्रांतिक विधिमंडळात काँग्रेसला बहुमत लाभले.विधिमंडळाचे सदस्य रामराव देशमुख यांनी १ ऑक्टोबर इ. स. १९३८ रोजी त्या विधिमंडळापुढे मांडलेला वेगळ्या वऱ्हाडाचा ठराव एकमताने मंजूर झाला.


                        इ. स. १९३८ रोजी पटवर्धन [ संदर्भ हवा ] व इ. स. १९४० मध्ये ग.त्र्यं. माडखोलकरांनी महाराष्ट्र एकीकरणाचा विषय उपस्थित केला[ संदर्भ हवा ]. माडखोलकरांनी महाराष्ट्र समाजात व्यापार व उद्योग भूमिपुत्रांच्या ताब्यात नसल्याचं व महाराष्ट्राचे काँग्रेस पुढारी एकीकरणासाठी प्रयत्न करत नसल्याचे म्हटले.*इ. स. १९४६चे साहित्य संमेलन माडखोलकरांच्या अध्यक्षतेखाली झाले. या संमेलनात 'संयुक्त महाराष्ट्र समिती' स्थापन झाले व संयुक्त महाराष्ट्राची मागणी करणारे तीन ठराव साहित्यकांनी पाठवले ज्याला राजकीय नेत्यांनी पाठिंबा दिला.त्यानंतर १५ दिवसांनी मुंबईत महाराष्ट्र साहित्य संमेलनात वऱ्हाडसह महाराष्ट्राचा एकभाषी प्रांत त्वरित करण्याच्या मागणीचा ठराव झाला. पुढच्या वषीर् नगरमधील साहित्य संमेलनाने त्याचा पुनरुच्चार केला.सर्व मराठी भाषाभाषी प्रदेशांचा मिळून जो प्रांत बनेल त्यास 'संयुक्त महाराष्ट्र' असे नाव देण्यात आले. या मागणीचा पाठपुरावा करण्यासाठी इ. स. १९४०च्या प्रारंभी मुंबईत भरलेल्या बैठकीत 'संयुक्त महाराष्ट्र सभा' स्थापन झाली.तिच्यातफेर् पुढील वषीर् महाराष्ट्र एकीकरण परिषद भरली. त्यात भाषणांपलिकडे काही झाले नाही. नंतर तीन महिन्यांत वऱ्हाडच्या प्रतिनिधींनी यापुढे सर्व लक्ष वऱ्हाडच्या प्रश्नावरच केंदित करण्याचे ठरवले. तरीही महाराष्ट्राच्या एकीकरणासाठी मदत करणे हे त्यांनी आपले कर्तव्यच मानले.पुढे दुसऱ्या महायुद्धाने जग ग्रासून टाकले. देशातही स्वातंत्र्यलढ्याचा वडवानल पेटला होता. युद्धसमाप्तीनंतर भारतात सत्तांतराची शक्यता स्पष्ट होऊ लागताच त्याचा घटकांचा एकजिनसीपणा साधेल अशा रीतीने भाषा तत्त्वावर पुनर्रचना करून घ्यावी या विचाराचा पुन्हा प्रादूर्भाव झाला.इ. स. १९४६ रोजीच भरलेल्या महाराष्ट्र एकिकरण परिषदेत स.का.पाटील यांनी मुंबईला महाराष्ट्राची राजधानी करण्यास विरोध केला. महाराष्ट्रातील डाव्या पक्षांनी सुरुवातीपासूनच मुंबईसह महाराष्ट्राला पाठिंबा दिला.या वातावरणात बेळगावात भरलेल्या महाराष्ट्र साहित्य संमेलनाने 'एकभाषी संयुक्त महाराष्ट्र ताबडतोब' अशी घोषणा केली आणि तिच्या अमलबजावणीसाठी समिती नेमली. तिचे सूत्रधार शंकरराव देव होते. त्यांनी पुढे मुंबईत भरवलेल्या परिषदेत 'संयुक्त महाराष्ट्र परिषदे'ची स्थापना झाली. तिचे स्वरूप सर्वपक्षीय ठरले तरी तिच्या कार्यकारिणीत कम्युनिस्टांच्या अंतर्भावास देव प्रतिकूल होते.
                          परिषदेच्या जळगावातील दुसऱ्या अधिवेशनात संयुक्त महाराष्ट्र व स्वतंत्र विदर्भ अशा दोन्ही मतप्रवाहांनी डोके वर काढले. शेवटी स्वतंत्र विदर्भाला थोडे झुकते माप देऊन दोन्ही मतप्रवाहांचा समन्वय घालणारा एक जुजबी ठराव झाला.यादरम्यान स्वातंत्र्य प्राप्त होऊन घटना तयार करण्यासाठी घटना समिती निवडण्यात आली. तिने घटक कसे असावेत याची चौकशी करून अहवाल देण्यासाठी 'दार कमिशन' नेमले. त्याने एक विक्षिप्त प्रश्नपत्रिका प्रसिद्ध करून त्या अन्वये निवेदने मागवली, तसेच साक्षींसाठी दौरा काढला.महाराष्ट्राची एकघटक राज्याची मागणी एकमुखाने मांडता यावी या हेतूने वऱ्हाडसह महाराष्ट्राच्या प्रतिनिधींची अकोल्यात ८ ऑगस्ट इ. स. १९४७ रोजी बैठक झाली. वऱ्हाड-नागपूरच्या मनात कसलाही किंतू राहू नये व त्याने संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीस पाठिंबा द्यावा, म्हणून प्रसिद्ध 'अकोला करार' बैठकीत झाला.या दरम्यान मुंबईत 'संयुक्त महाराष्ट्र परिषदे'चे विराट अधिवेशन भरले. त्यात एकभाषी व स्वायत्तच नव्हे, तर समाजसत्ताक महाराष्ट्राच्या प्रतिष्ठापनेचा ठराव झाला.

                           १९४८च्या शेवटी 'दार कमिशन'चा अहवाल आला. 'भाषिक राज्याच्या बुडाशी उपराष्ट्रवाद आहे' असे त्याचे सारसर्वस्व होते. सर्वत्र त्याचा निषेध झाला.तो स्वीकारण्यास काँग्रेसही धजली नाही. या प्रश्नाचा पुन्हा विचार करण्यासाठी नेहरू-पटेल व पट्टभी सीतारामय्या या श्रेष्ठींची समिती नेमली. 'जे.व्ही.पी. समिती' ती हीच. या समितीने ५ एप्रिल इ. स. १९४९ रोजी अहवाल सादर केला. तेलुगू भाषिक राज्याला मान्यता.कन्नडीग राज्याला आशीर्वाद आणि महाराष्ट्राला अविरोध, मात्र त्याला मुंबई मिळणार नाही ही अट; तसेच एकट्या वऱ्हाडचा प्रांत निराळा होणार नाही, असे त्याचे तात्पर्य होते.अहवाल अनुकूल असलेल्या आंध्र व कर्नाटक प्रांतांना हायसे वाटले. त्यामुळे तेथील चळवळ सौम्य झाली. महाराष्ट्रात मात्र तीव्र निराशा व संताप पसरला.संयुक्त महाराष्ट्र परिषदेतील काँग्रेसजन निश्चेष्ट झाले. परिषद निष्क्रिय झाली तेव्हा लोकांनीच लोकमत जागृत व बोलके ठेवण्याचा उपक्रम सुरू केला. त्यातील पहिली परिषद ठाणे जिल्ह्यातील कल्याण येथे भाऊसाहेब हिरे यांच्या अध्यक्षतेखाली झाली.या लढ्यासाठी जनतेला उद्युक्त केले पाहिजे या हेतूने सेनापती बापट यांनी 'प्रभातफेरी'चा उपक्रम सुरू केला. पुढे त्यास मिरवणुकीचे स्वरूप येऊ लागले.त्या दरम्यान महाराष्ट्र काँग्रेसशी बोलून महाराष्ट्र-कर्नाटक दरम्यानचा सीमातंटा मिटवण्यासाठीचा पवित्रा कर्नाटकने टाकला.३० ऑक्टोबर इ. स. १९४९ रोजी त्यासाठी बैठकही झाली. मात्र ती निष्फळ ठरली. बेळगाव-कारवार भागावर हक्क सांगणारे निवेदन कर्नाटकने प्रसिद्ध केल्यापासून त्या भागातील मराठी समाज अस्वस्थ झाला होता.
याबाबत चळवळीसाठी डॉ. कोवाडकर यांच्या परिश्रमाने 'महाराष्ट्र एकीकरण परिषद' नावाची संघटना वर्षदीड वर्षापासून निघालेली होती. या भागातील जनतेचे मत व्यक्त करण्यासाठी ९ जानेवारी इ. स. १९५० रोजी प्रथमच संयुक्त महाराष्ट्र परिषद भरली.त्याआधी २८ नोव्हेंबर १९४९ रोजी आचार्य अत्रे व आर. डी. भंडारे यांनी मुंबई कॉपोर्रेशनपुढे महाराष्ट्राचा ठराव मांडला. तो पास झाला.
                                 २६ जानेवारी १९५० रोजी स्वतंत्र व स्वयंसिद्ध भारताच्या नव्या घटनेचे प्रवर्तन मोठ्या सोहळ्याने झाले. मात्र एका गोष्टीमुळे भारतीय जनतेच्या तोंडात निराशेची कडू चव रेंगाळत राहिलीच.
ब्रिटिशांनी पाडलेले प्रांतच या घटनेने मान्य केले होते. याची विषादी भावना साऱ्या दाक्षिणात्य भारतात उफाळून उठली. विशाल आंध्र महासभेची बैठक फेब्रुवारी इ. स. १९५० मध्ये भरली.१ एप्रिल १९५० पर्यंत आंध्र राज्याची स्थापना न झाल्यास आंध्रने भारतीय संघराज्यातून फुटून निघावे, असा ठराव त्यात मांडला गेला. मात्र तो संताप तात्पुरता शमवला गेला. पण दोन वर्षांनंतरही आंध्र राज्यस्थापनेचे चिन्ह दिसेना.तेव्हा पोट्टी रामल्लू यांनी उपोषण सुरू केले व अठ्ठावन्न दिवसांनी त्यांचा अंत झाला. त्यामुळे संतापाचा डोंब उसळला. याच सुमारास कर्नाटकातही संतापाची लाट उसळली.महाराष्ट्रात असे काहीच झाले नाही. इथेही तीव्र संताप पसरलेला असला तरी त्याला एकसंध करणारी मध्यवतीर् संघटना नव्हती. ही अवस्था लक्षात घेऊनच कै. पट्टभी सीतारामय्या यांनी 'महाराष्ट्राची चळवळ अजून बाल्यावस्थेत आहे', असे हेटाळणीचे उद्गार काढले.संयुक्त महाराष्ट्र चळ्वळीस जोर येण्यास अजून चार वर्षांचा अवधी गेला स्वातंत्र्यानंतर भाषिक राज्यांची मागणी होऊ लागली. आंध्र प्रदेश राज्याची मागणी पोट्टी श्रीरामल्लू यांच्या बलिदानानंतर पूर्ण झाली.
भाषावार प्रांतरचेनेसाठी नेमलेल्या कमिशनाने महाराष्ट्र राज्याची मागणी डावलली
दार कमिशन व जे.वी.पी कमिटी
                          डिसेंबर इ. स. १९४८ रोजी प्रसिद्ध झालेल्या दार कमिशनच्या अहवालात भाषावर प्रांतरचेनेला विरोध दर्शविण्यात आला होता व महाराष्ट्रीय लोकांवर अपमानास्पद टिप्पणी होती जे.वी.पी कमिटीने महाराष्ट्र व कर्नाटकच्या मागणीला पाठिंबा दिला नाही व मुंबईमहाराष्ट्रात देण्यास विरोध केला. मुंबई अनेक भाषांच्या व वर्णाच्या लोकांचं, उद्योगधंद्याचे शहर आहे असे अहवालात म्हटले होते.वल्लभभाई पटेलांनी मुंबईचा विकास गुजराती भाषकांनी केल्याचे नमूद केले.
फाजलअली आयोग
डिसेंबर इ. स. १९५३ रोजी फाजलअली यांच्या अध्यक्षेतेखाली राज्य पुनर्रचना आयोगाची नियुक्ती झाली. संयुक्त महाराष्ट्राच्या वतीने एस.एम.जोशी,धनंजय गाडगीळसह इतरांनी आयोगासमोर आपली बाजू मांडली.इ. स. १९५५ रोजी आयोगाचा निवाडा जाहीत झाला. पुनर्रचनेबाबत पायाभूत तत्त्व सगळ्यांना सारखी लागू केलेली नव्हती आणि त्यात मोठी विसंगती होती. हैद्राबादसाठी एक भाषिकाच तत्त्व तर मुंबईसाठी द्वैभाषिकाचं. मुंबई प्रांतात गुजराती भाषिक सौराष्ट्र समाविष्ट करून मराठी भाषिक विदर्भ ,बेळगाव-कारवार बाहेर ठेवले गेले.मुंबईच्या विकासासाठी तिला गुजरातपासून वेगळे ठेवणे योग्य नाही व बेळगाव भाग कर्नाटकाशी 'आर्थिकदृष्ट्या' जोडला असल्याचे तसेच विदर्भ महाराष्ट्रात घातल्यास नागपूर शहराचे महत्त्व कमी होईल असे अहवालात नमूद करण्यात आले.आयोगाला या द्वैभाषिकात मराठी भाषिकांची संख्या गुजराती भाषिकांपेक्षा जास्त होऊ द्यायची नव्हती असेच या विसंगतीचे कारण म्हणावे लागेल.

चळवळीस सुरुवात
महाराष्ट्र राज्य या आयोगाच्या विरोधात महाराष्ट्रभर असंतोषाचा डोंब उसळला. नेहरूनी त्यामुळे सौराष्ट्रासह गुजरात, विदर्भासह महाराष्ट्र व स्वतंत्र मुंबई अशा त्रिराज्य योजना जाहीर केली.त्रिराज्य योजनेत महाराष्ट्रापासून मुंबई तोडण्यामुळे अन्यायाची भावना मराठीजनांत पसरली व संयुक्त महाराष्ट्र चळवळीने पेट घेतला. 'मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे' हे या आंदोलनाचे घोषवाक्य बनलंमहाराष्ट्रीय काँग्रेस नेत्यांनी केंद्रीय नेतृत्वासमोर गुडघे टेकले. यामुळे काँग्रेसनेते जनतेच्या नजरेतून उतरले. यशवंतराव चव्हाण यांच्यासारखे ज्येष्ठ नेत्याने तर नेहरु व संयुक्त महाराष्ट्रात ,मला नेहरु महत्त्वाचे वाटतात असे म्हटले.महाराष्ट्रातील कम्युनिस्ट, सोशालीस्ट व प्रजासमाजवादी पक्षातील डावे पुढारी व काँग्रेसेतरांनी संयुक्त महाराष्ट्राचा लढा हातात घेतला. सेनापती बापट, एस.एम.जोशी, प्रल्हाद केशव अत्रे, श्रीपाद डांगे, शाहीर अमर शेख, प्रबोधनकार ठाकरे हे चळवळीतील महत्त्वाचे नेते ठरले. एस.एम. जोशी, श्रीपाद डांगे यांनी लढ्याचे नेतृत्व केले.अत्र्यांनी आपल्या 'मराठा' या दैनिकात संयुक्त महाराष्ट्राचा जोरदार पुरस्कार केला तर विरोधकांवर बोचरी व कठोर टीका केली. त्यांच्या भाषणातून संयुक्त महाराष्ट्राला विरोध करणार्याचा खरपूस समाचार घेतला.शाहीर अमर शेख,शाहिर अण्णाभाऊ साठे,शाहिर गव्हाणकर ह्यांनी आपल्या कलाविष्काराने मराठी अस्मिता जागृत ठेवली.२० नोव्हेंबर इ. स. १९५५ मोरारजी देसाई व स.का.पाटील या काँग्रेस नेत्यांनी चौपाटीवर सभा घेऊन प्रक्षोभक विधाने केली.पाटलांनी 'पाच हजार वर्षांनी सुध्दा मुंबई महाराष्ट्राला मिळणार नाही व मोरारजींनी 'काँग्रेस जिवंत असेपर्यंत मुंबई महाराष्ट्राला मिळणार नाही, गुंडगिरीला योग्य जबाब मिळेल' अशी मुक्ताफळं उधळली.लोकांनी संतापून सभा उधळली. २१ नोव्हेंबर इ. स. १९५५ रोजी झालेल्या आंदोलनावेळेस पोलिसांनी केलेल्या गोळीबारामुळे १५ जणांना प्राण गमवावा लागला. जाने-फेब्रु इ. स. १९५६ रोजी केंद्रशासित मुंबईची घोषणा केल्यानंतर लोक रस्त्यावर उतरली.हरताळ, सत्याग्रह व मोर्चे सुरू झाली. मोरारजीच्या सरकारने सत्तेचा दुरुपयोग करून निष्ठूरपणे ८० लोकांना गोळीबारात मारले. संयुक्त महाराष्ट्रातील आंदोलनात एकूण १०५ जणांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. त्यांच्या स्मरणार्थ मुंबईच्या फ्लोरा फाउंटन भागात हुतात्मा स्मारक उभारले गेले.संयुक्त महाराष्ट्र समितीने दिल्ली येथे प्रचंड सत्याग्रह घडवून आणला.चळवळीच्या काळात जनतेच्या असंतोषामुळ, नेहरुंना महाराष्ट्रात सुरक्षारक्षकांसोबत फिरावे लागे व त्यांचे स्वागत काळ्या झेंड्यांनी व निषेधानेच होई.भारताचे अर्थमंत्री सी.डी देशमुखांनी महाराष्ट्रावरील होणाऱ्या अन्यायाच्या निषेधार्थ आपला राजीनामा दिला. या राजीनाम्यामुळे चळवळीला अधिक बळ मिळाले.*
संयुक्त महाराष्ट्राची स्थापना
१ नोव्हेंबर इ. स. १९५६ला केंद्राने सौराष्ट्र, गुजरात,मराठवाडा, विदर्भ व मुंबई इलाख्यातील सर्व मराठी प्रदेश मिळून (परंतू बेळगाव-कारवार वगळून) विशाल द्विभाषिक स्थापले.परंतू या द्विभाषिकाचे महाराष्ट्र व गुजरात येथेही कडाडून विरोध झाला. १९५७च्या सार्वत्रिक निवडणुकीत समितीला भरघोस यश मिळाले.काँग्रेसचे नेतृत्व या सर्व प्रकारामुळे व १९६२ ला होणाऱ्या निवडणुकीला सामोरे जायचे असल्यामुळे संयुक्त महाराष्ट्राला अनुकूल झाले. इंदिरा गांधीने नेहरुंचे मन वळवले.द्वैभाषिकची विभागणी करताना महाराष्ट्र राज्याला गुजरात राज्याला १० कोटी द्यायचे व पुढील ४ वर्षात ती रक्कम कमी करत आणायची अशी अट मान्य झाली.तसेच मुंबईचा विकास व उभारणी गुजराती भांडवलदारांनी केली असा दावा गुजराती भाषिक करत होते व त्याचं 'व्याज' म्हणून एकूण ५० कोटी देऊनच मुंबई महाराष्ट्राला मिळाली.मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र स्थापन झाला तरी त्यात बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर व डांगचा समावेश झाला नाही. बेळगावबाबतचा महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न आजही चालू आहे. नेहरुंना राज्याला हवे असलेले 'मुंबई' नाव वगळून समितीने 'महाराष्ट्र'असे नाव ठरवले व राज्याची स्थापना कामगारदिनी म्हणजे १ मे रोजी केली गेली.महाराष्ट्र स्थापनेचा कलश पहिले मुख्यमंत्री यशवंतरावांच्या हस्ते आणला गेला. नव्या राज्याची मुंबई ही राजधानी व नागपूर उपराजधानी निश्चित झाली.

Wednesday, 3 May 2017

महाराष्ट्रातील ज्योतिर्लिँगे !!!  
  1. घृष्णेश्वर - वेरूळ, औरंगाबाद
  2. परळी वैज्यनाथ - परळी, बीड
  3. औँढा नागनाथ - औँढा, हिँगोली
  4. भीमाशंकर - पुणे
  5. ञ्यंबकेश्वर – नाशिक
जगातील सर्वात लांब !!
  1. सर्वात लांब नदी - नाईल (इजिप्त) ६६७० किमी
  2. सर्वात लांब नदी - लँम्बर्ट (अंटार्क्टिका) ४०२ किमी
  3. सर्वात लांब कालवा - सएज कालवा (इजिप्त) १६२ किमी
  4. रेल्वेचा सर्वात लांब बोगदा - सैकन रेल्वे बोगदा जपान.
  5. सर्वात लांब भिँत - चीनची भिँत (२२४० मी)
विवीध क्रांती-
  1. हरितक्रांती - अन्नधान्य उत्पादनात वाढ
  2. धवलक्रांती - दुध उत्पादनात वाढ
  3. श्वेतक्रांती - रेशीम उत्पादनात वाढ
  4. लालक्रांती - शेळी, मेँढी उत्पादनात वाढ
  5. नीलक्रांती - मत्स्योत्पादनात वाढ
  6. पीतक्रांती - तेलबिया उत्पादनात वाढ
  7. ईक्रांती - इलेक्ट्राँनिक माध्यमांचा वापर
  8. तपकिरी क्रांती - कोकोच्या उत्पादनात वाढ
जगातील सर्वात लांब !!
  1. सर्वात लांब नदी - नाईल (इजिप्त) ६६७० किमी
  2. सर्वात लांब नदी - लँम्बर्ट (अंटार्क्टिका) ४०२ किमी
  3. सर्वात लांब कालवा - सएज कालवा (इजिप्त) १६२ किमी
  4. रेल्वेचा सर्वात लांब बोगदा - सैकन रेल्वे बोगदा जपान.
  5. सर्वात लांब भिँत - चीनची भिँत (२२४० मी)
भारतातील काही अभयारण्ये-
  1. पेरियार अभयारण्य (हत्ती) - इद्दुकी (केरळ)
  2. गीरचे अभयारण्य (सिँह) - जुनागड (गुजरात)
  3. चंद्रप्रभा अभयारण्य - वाराणसी (उ. प्रदेश)
  4. जालपाडा अभयारण्य - जलपैगुडी (प. बंगाल)
  5. राधानगरी अभयारण्य (गवे) - कोल्हापूर (महाराष्ट्र)
  6. मेळघाट अभयारण्य (वाघ) - अमरावती (महा.)
  7. देऊळगाव - रेहेकुरी अभयारण्य (काळवीट)
  8. सुंदरबन अभयारण्य (वाघ) - नगर (महा.)
  9. मानस अभयारण्य (वाघ) - बारपेटा (आसाम)
  10. इंद्रावती अभयारण्य (वाघ) - बस्तर (छत्तीसगढ)
भारतातील सात आश्चर्ये !!!
  1. ताजमहाल - आग्रा
  2. गोलघुमट - विजापूर
  3. वेरूळ लेणी - वेरूळ, औरंगाबाद
  4. मीनाक्षी मंदिर - मदुराई
  5. कुतुबमिनार - दिल्ली
  6. गोमटेश्वरचा पुतळा - श्रवणबेळगोळ
  7. जयस्तंभ – चित्तोडगड
जिल्हे व त्यांची टोपणनावे-
  1. मुंबई - भारताचे प्रवेशव्दार
  2. नगर - साखर कारखन्यांचा जिल्हा
  3. अमरावती - दमयंतीचा जिल्हा
  4. औरंगाबाद - मराठवाड्याची राजधानी
  5. कोल्हापूर - कुस्तीगीरांचा जिल्हा
  6. गडचिरोली - जंगलांचा जिल्हा
  7. गोँदिया - तलावांचा जिल्हा
  8. चंद्रपूर - गोँड राजांचा जिल्हा
  9. जळगाव - केळींचा जिल्हा
  10. नागपूर - संञ्यांचा जिल्हा
थोडक्यात महत्त्वाचे !!!
  1. जिल्हा विभाजन प्रथम रत्नागिरी जिल्ह्याचे झाले.
  2. कोकणाच्या सखल भागास खलाटी म्हणतात.
  3. सह्याद्री पर्वतरांगेत क्रमांक दोनचे शिखर साल्हेर आहे.
  4. कोकणातील नद्या पश्चिम वाहिनी आहेत.
  5. तानसा, विहार व वैतरणा तलाव मुंबई शहराला पाणीपुरवठा करतात.
तुम्हाला माहित आहे का?
  1. भारतातील पहिली ताग गिरणी कोलकाता येथे आहे.
  2. Water and Land management Institute (WALMI) हि संशोधन संस्था औरंगाबाद येथे आहे.
  3. राष्ट्रीय एड्स संशोधन संस्था (NARI) ही वैद्यकीय संशोधन संस्था पुणे येथे आहे.
  4. शिवाजी विद्यापीठाची स्थापना १९६३ साली झाली.
  5. भारतातील आंध्रप्रदेश राज्य भाषिक तत्त्वावर सर्वप्रथम अस्तित्वात आले.
दिल्ली येथील समाधीस्थळे-
  1. राजघाट - म. गांधी
  2. शांतिवन - पंडित नेहरू
  3. शक्तीस्थळ - इंदिरा गांधी
  4. विजयघाट - लालबहादूर शास्ञी
  5. वीरभूमी - राजीव गांधी
  6. किसानघाट - चरणसीँग
  7. समतास्थळ – जगजीवनराम
शोध-संशोधक-देश
  1. फाऊंटन पेन - एल. इ. वाँटरमन
  2. सुक्ष्मदर्शक - झेड जाँन्सन - हाँलड
  3. छपाई मशिन - जाँन गुटेनबर्ग - जर्मनी
  4. यंञ माग - कार्ट राईट - इंग्लंड
  5.  पाणबुडी - डेव्हिड - बुशनेल - अमेरिका
  6.  शिवणयंञ - एलियास हो - संयुक्त संस्थाने
  7. थर्मामीटर - गँलिलिओ - इटली
  8. ट्रान्झिस्टर - डब्लू. शँकले - अमेरिका
  9. टाइपरायटर - सी. सोल्स - संयुक्त संस्थाने
  10.  टि. व्ही. - जे. एल. बेअर्ड - इंग्लंड
उपकरण - ते काय मोजते?
  1. अल्टिमीटर - उंचीतील फरक
  2. अँमीटर - विद्युत प्रवाहाची शक्ती
  3. अँनेमोमीटर - वाऱ्यारची दिशा व वेग
  4.  बँरोमीटर - हवेचा दाब
  5.  कँलरीमीटर - उष्णतेचे प्रमाण
  6. क्लिनीकल थर्मोमीटर - शरिराचे तापमान मोजण्यासाठी
  7. हायग्रो मीटर - वातावरणातील सापेक्ष आर्द्रता
  8. लँक्टोमीटर - दुधाची सापेक्ष घनता
  9. मायक्रोमीटर - सुक्ष्म अंतरे वा कोन मोजणे
  10. मायक्रोस्कोप - सुक्ष्म पदार्थ मोठे करून दाखविणे
प्रमुख नद्या व लांबी-
  1. ब्रम्हपुञा - २९०० किमी
  2. सिँधू - २९०० किमी
  3. गंगा - २५९० किमी
  4. गोदावरी - १४५० किमी
  5. यमुना - १३७६ किमी
  6. नर्मदा - १२९० किमी
  7. कृष्णा - १२९० किमी
  8. घाघरा - १०८० किमी
  9. सतलज - १०५० किमी
  10. महानदी - ८९० किमी
भारतातील समाजसुधारक व कार्यकाल-
  1. स्वामी विवेकानंद - १८६३ ते १९०२
  2. म. फुले - १८२७ ते १८९०
  3. महर्षी विठ्ठल शिंदे - १८७३ ते १९४४
  4. महर्षी धोंडो केशव कर्वे- १८५८ ते १९६२
  5. डाँ. बाबासाहेब आंबेडकर - १८९१ ते १९५६
  6. राजर्षी शाहू महाराज - १८७४ ते १९२२
  7. पंडिता रमाबाई - १८५८ ते १९२२
  8. साविञबाई फुले - १८३१ ते १८९७
भारतातील सर्वाधिक-
  1. उष्ण हवेचे ठिकाण - गंगानगर, राजस्थान
  2. पाऊस - मावसिनराम, मेघालय
  3. साक्षरता - केरळ
  4. लोकसंख्या - उ. प्रदेश
  5. लोकसंख्येची घनता - प. बंगाल
  6. मोठा रस्ता - ग्रँड ट्रंक रोड
  7. स्ञियांचे प्रमाण - केरळ
  8. शहरीकरण - महाराष्ट्र
  9. थंड हवेचे ठिकाण - गुलमर्ग, काश्मिर
  10. लांब बोगदा - करबुडे, रत्नागिरी
भारतातील पहिले व्यक्ती-
  1. पंतप्रधान - प. नेहरू
  2. राष्ट्रपती - राजेँद्र प्रसाद
  3. अवकाशवीर - राकेश शर्मा
  4. नोबेल पुरस्कार विजेते - रविंद्रनाथ टागोर
  5. भुदल सेनापती - जनरल करिअप्पा
  6. फिल्ड मार्शल - जनरल मानकेशा
  7. वैमानिक - जे. आर. डी. टाटा
  8. एव्हरेस्ट गिर्यारोहक - तेनसिंग नोर्के
गोड्या पाण्याची सरोवरे-
  1. वुलर (सर्वात मोठे) - काश्मिर
  2. दाल - काश्मिर
  3. कोलेरू - आंध्रप्रदेश
खाऱ्या् पाण्याची सरोवरे-
  1. सांभर (सर्वाधिक क्षारता) - राजस्थान
  2. चिल्का - ओरिसा
  3. बेँबनाड (कायल) - केरळ
  4. पुलीकत - आंध्रप्रदेश

Thursday, 27 April 2017


सूर्यमालेतील ग्रह व त्यासंबंधीची माहिती :

1. ग्रहाचे नाव - बूध
सूर्यापासुन चे अंतर - 5.79
 परिवलन काळ - 59
 परिभ्रमन काळ - 88 दिवस
 इतर वैशिष्टे - सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह, आकाराने सर्वात लहान
 व सूर्यमालिकेतील सर्वात वेगवान ग्रह असून या ग्रहाला एकही उपग्रह नाही.



2. ग्रहाचे नाव - शुक्र
सूर्यापासुन चे अंतर - 10.82
 परिवलन काळ - 243 दिवस
 परिभ्रमन काळ - 224.7 दिवस
 इतर वैशिष्टे - सूर्यकुलातील सर्वात तेजस्वी ग्रह पृथ्वीवरून संध्याकाळी व
 सकाळी आकाशात दिसतो. हा स्वत:भोवती पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरतो.



3. ग्रहाचे नाव - पृथ्वी
सूर्यापासुन चे अंतर - 14.96
 परिवलन काळ - 23.56 तास
 परिभ्रमन काळ - 365 1/4 दिवस
 इतर वैशिष्टे - सूर्यमालिकेत केवळ पृथ्वीवरच प्राणीसृष्टी व वनस्पती सृष्टी आढळते.
 हा ग्रह जलग्रह म्हणून ओळखला जातो. चंद्र हा पृथ्वीचा उपग्रह आहे.



4. ग्रहाचे नाव - मंगळ
सूर्यापासुन चे अंतर - 22.9
 परिवलन काळ - 24.37 तास
 परिभ्रमन काळ - 687
 इतर वैशिष्टे - शुक्रानंतरचा पृथ्वीच्या जवळील दूसरा ग्रह.
 या ग्रहास दोन उपग्रह आहेत.



5. ग्रहाचे नाव - गुरु
सूर्यापासुन चे अंतर - 77.86
 परिवलन काळ - 9.50 तास
 परिभ्रमन काळ - 11.86 वर्षे
 इतर वैशिष्टे - सूर्यकुलातील सर्वात मोठा ग्रह
 असून गुरूला त्रेसष्ट उपग्रह आहेत.



6. ग्रहाचे नाव - शनि
सूर्यापासुन चे अंतर - 142.6
 परिवलन काळ - 10.14 तास
 परिभ्रमन काळ - 29 1/2 वर्ष
 इतर वैशिष्टे - सूर्यकुलातील दूसरा मोठा ग्रह या 
ग्रहाभोवती कडी आहेत. या ग्रहास त्रेपन्न उपग्रह आहेत.



7. ग्रहाचे नाव - युरेनस
सूर्यापासुन चे अंतर - 268.8
 परिवलन काळ - 16.10 तास
 परिभ्रमन काळ - 84 वर्षे
 इतर वैशिष्टे - या ग्रहाचा शोध 13 मार्च 1781 रोजी जर्मन खगोल
 शास्त्रज्ञ हर्षलने लावला. हा ग्रह जर्मन देवता युरेनस या नावाने 
ओळखला जातो. या ग्रहास सत्तावीस उपग्रह आहेत. हा स्वत:भोवती पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरतो.



8. ग्रहाचे नाव - नेपच्यून
सूर्यापासुन चे अंतर - 449.8
 परिवलन काळ - 16 तास
 परिभ्रमन काळ - 164 1/2 वर्षे
 इतर वैशिष्टे - या ग्रहाचा शोध सन 1886 मध्ये लागला.
या ग्रहास एकूण तेरा उपग्रह आहेत.
हा स्वत:भोवती पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरतो.


Wednesday, 21 December 2016

_*२०१६ मधील महत्वाच्या समित्या*_

*👉 राजन गोगोई समिती*

👉 मध्यप्रदेश उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या कथित लैंगिक शोषण प्रकरणासाठी नेमलेली समिती.

*👉 परमराजसिंग उमरानंगल समिती*

👉 भारतीय हॉकी कर्णधार सरदारसिंगवर ब्रिटिश युवतीने लैंगिक शोषणाचा आरोप केल्या प्रकरणी चौकशी करण्यासाठी नेमलेली समिती.

*👉 एच.एस. बेदी समिती*

👉 शिखावरील सोशल मीडिया व सार्वजनिकरित्या केले जाणारे विनोदी किस्से बंद करण्याबाबत उपाययोजना सुचविण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने नेमलेली समिती.

*👉 गोपाळ सुब्रमण्यम समिती*

👉 दिल्ली अँड डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशन मधील कथित गैरप्रकाराची चौकशी करण्यासाठी नेमलेली समिती.

*👉 दीपक मोहांती समिती*

👉 वित्तीय समायोजनाचे धोरण या नजीकच्या भविष्यातील दिशा निश्चित करण्या संदर्भात भारतीय रिझर्व्ह बँकेने स्थापन केलेली समिती.

*👉 श्याम बेनेगल समिती*

👉 सेन्सॉर बोर्डाची पुनर्रचना करण्यासाठी आणि सिनेमॅटोग्राफ कायद्यात बदल सुचविण्यासाठी नेमण्यात आलेली समिती.

*👉 अरविंद पनगारिया समिती*

👉 जपान बरोबर मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन समस्या सोडविण्यासाठी

*👉 एम. वेंकच्या नायडू समिती*

👉 जाट समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात केंद्र सरकारने नेमलेली समिती

*👉 बी.के. प्रसाद समिती*

👉 इशरत जहां प्रकरणातील गहाळ फायलींचा शोध घेण्यासाठी नेमलेली समिती.

*👉 डॉ. हर्षदीप कांबळे समिती*

👉 ऑनलाइन औषध खरेदी गैरव्यवहार करणार्‍या कंपन्यांवर निर्बंध लावण्यासाठी कायदा करण्यासंदर्भात केंद्र सरकारने नेमलेली समिती.

*👉 मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस समिती*

👉 राज्यातील डान्सबार बंदीसाठी नवा कायदा करण्यासाठी नेमलेली

*👉 प्रो. राकेश भटनागर समिती*

👉 जेएनयू विद्यापीठ (दिल्ली) मधील चिथावणीजनक दिलेल्या घोषाणांच्या अभ्यास करण्यासाठी नेमलेली समिती

*👉 विलास बर्डेकर समिती*

👉 राज्याच्या शाश्वत विकासाबरोबरच जैववैविध्याचे सर्वेक्षण करण्यासाठी भविष्याचा वेध घेऊन कृती आराखडा करण्याच्या सुचना सुचविण्यासाठी नेमलेली समिती.

*👉 भगवान सहाय्य समिती*

👉 राज्य शासनाचा सार्वजनिक आरोग्य विभागाचा औषधी खरेदी घोटाळा अभ्यास करण्यासाठी नेमलेली समिती

*👉 आर.एम. लोढा समिती*

👉 नॅशनल एलिजीबिलिटी अँड एंस्ट्रन्स टेस्ट (NIIT, नीट), मेडिकल कौन्सिलच्या कामावर तसेच परीक्षेच्या कामावर देखरेख ठेवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने नेमलेली समिती.

*👉 पी भट्टाचार्य समिती*

👉पठाणकोटमधील हवाई दलाच्या तळावरील हल्याबद्दल चौकशी करण्यासाठी नेमलेली समिती.

Wednesday, 12 October 2016

बेरिलियम

 बेरिलियम 



• सर्वसाधारण गुणधर्म- दृश्यरूप

• अणुभार- ग्रॅ·मोल −१


(Be) (अणुक्रमांक ४) बेरिलियम (मराठीत बिडूर)हा एक असा धातू आहे की जो पाण्यात बुडत नाही, पोलादापेक्षाही ताकदवान आहे, रबरासारखा लवचिक, प्लॅटिनम सारखा कठीण आणि कायमचा टिकाऊ असे याचे गुण आहेत. उत्कृष्ट उष्णता वाहकता, उष्णता संचयनाची उच्च क्षमता आणि उष्णता रोधकता हे गुण बेरिलियमच्या अंगी असल्याने याचा वापर अवकाश अभियांत्रिकीत शक्य झाला. बेरिलियमपासून तयार होणारे भाग आपली तंतोतंत घडण आणि काटेकोर आकार
फार उत्तम प्रकारे टिकवू शकतात. यामुळे अग्निबाणांची, अवकाशयानांची, कृत्रिम उपग्रहांची स्थैर्यता राखणार्या आणि दिशानिश्चिती करणार्या गायरोस्कोप उपकरणात बेरिलियमपासून बनविलेले भाग मोठ्या प्रमाणात वापरले जातात. बेरिलियमचे ज्वलन होतांना दर कि. ग्रॅ. ला १५,००० किलोकॅलरी एवढी प्रचंड  ष्णता बाहेर पडते म्हणून पृथ्वीबाहेर होणाऱ्या अवकाश उड्डाणात एक अत्यंत कार्यक्षम इंधन म्हणूनही बेरिलियमचा उपयोग करण्याच्या दृष्टीने विचार होत आहेत.

अति हलक्या धातूंपैकी एक असूनही बेरिलियम उत्कृष्ट ताकदीचे आहे शिवाय मॅग्नेशियम, अॅऍल्युमिनियम यांच्या पेक्षाही त्याचा उकळणबिंदू जास्त वरचा आहे. बेरिलियम आणि तांबे यांच्या बेरिलियम-ब्राँझ नामक मिश्रधातूचे अनेक प्रकार विमान उद्योगात विस्तृतपणे वापरले जातात. आवश्यक असलेली उच्च ताकद, सतत होणाऱ्या ताणामुळे येणारी मरगळ दूर ठेवण्याची क्षमता, गंजरोधकता हे गुण बेरिलियम-ब्राँझ या मिश्र धातूच्या अंगी आहेत. या कारणाने विमानात वापरले जाणारे १,००० पेक्षाही जास्त सुटे भाग हे बेरिलियम-ब्राँझ पासुन बनविलेले असतात.

या मिश्रधातूचा उपयोग काही हत्यारे बनविण्यासाठीही होतो व त्यांचा वापर स्फोट होऊ शकेल अशा ठिकाणी केला जातो कारण या मिश्रधातूच्या आपटण्याने कोणत्याही प्रकारची ठिणगी निघत नाही. बेरिलियम- मॅग्नेशियम, बेरिलियम-लिथियम ही संयुगेही मोठ्या प्रमाणात वापरली जातात.

बेरिलियमच्या अनेक खनिजांपैकी पाचू , बेरूज, हेलियोडोर, वैडूर्य , फेनाकाइट, युक्लेज, हेमवैदूर्य , व्हेरोबायेव्हाइट आणि अॅलेझांड्राइट असे काही विशेष गाजलेले खनिज पदार्थ आहेत. पैकी हिरव्या एमराल्डची चमक, रंगाची शुद्धता, काळीशार वाटणारी गडद हिरव्या रंगापासून ते नेत्रदीपक चमचमत्या मोरपंखी रंगाचे अनेक प्रकार कित्येक शतकांपासून मानवाला भुरळ घालत आले आहेत. तर अॅलेझांड्राइट हा विस्मयजनक प्रकार असून तो दिवसा गर्द हिरव्या रंगाचा असतो तर हा रात्रीच्या कृत्रिम प्रकाशात किरमिजी रंगात दिसतो.

लिथियम

 लिथियम 



• नाव, चिन्ह, अणुक्रमांक- लिथियम, Li, 3 दृश्यरूप

• रासायनिक श्रेणी- अल्कली धातू

• अणुभार- 6.941ग्रॅ·मोल −१

• भौतिक गुणधर्म-स्थिती- घन

(Li) ( अणुक्रमांक ३) अल्कली धातूरूप रासायनिक पदार्थ. ग्रीक भाषेतील शब्द लिथॉस म्हणजे दगड या अर्थाने या धातूस लिथियम नाव देण्यात आले आहे. १८१७ साली स्वीडिश रशायनशास्त्रज्ञ आर्फेडसन यांनी लिथियमचा शोध लावला. तर १८५५ साली जर्मन रशायनशास्त्रज्ञ बुनसेन आणि इंग्लिश रशायनशास्त्रज्ञ मॅथिसन यांनी स्वतंत्रपणे, वितळलेल्या लिथियम क्लोराईडपासून विद्युतविच्छेदन करून लिथियमची शुद्ध प्रत मिळविली.




लिथियम हा धातू मृदु व रुपेरी रंगाचा असून पाण्यापेक्षा अर्ध्या वजनाचा आहे, हलकेपणात लिथियमचा कोणीच प्रतिस्पर्धी नाही. त्याच्यापेक्षा ऍल्युमिनियम ५ पट, लोखंड १५ पट आणि ओस्मियम ४० पट अधिक वजनदार आहेत. सभोवतालच्या सर्वसाधारण तपमानातदेखील लिथियम हवेतील हायड्रोजन , नायट्रोजन आणि ऑक्सिजन यांच्याशी द्रुतगतीने प्रक्रिया पावतो. म्हणून लिथियम वॅसलीन किंवा तत्सम मेण्चट पदार्थात खोल साठवून ठेवतात. हायड्रोजनशी संयोग पावण्याच्या या गुणधर्मामुळे लिथियम अनेक ठिकाणी उपयोगी पडतो उदा. पाणीबुडीतील हवा शुद्ध करण्यासाठी, विमानातील श्वसन उपकरणांमध्ये, वातानुकूल उपकरणांमध्ये, इ. लिथियमचा उपयोग पदार्थास खास प्रकारची चकाकी देण्यात, रंगांमध्ये, चिनी मातीच्या वस्तुंमध्ये करतात. लिथियम फ्ल्युरॉक्साइड पासून तयार करण्यात येणारी विशेष काच अतिउच्च पारदर्शकता या गुणामुळे दुर्बिणीसाठी वापरतात.




या काचेतून जंबुपार (अल्ट्रा व्हायोलेट) प्रकाश आरपार जाऊ शकतो. लिथियमची काही संयुगे - स्टिअरेट, पामिटेट वगैरे विस्तृत तपमानातही आपले भौतिक गुणधर्म टिकवून ठेऊ शकत असल्याने त्यापासून उत्तम प्रकारचे वंगण तयार करता येते. जिथे ० अंश से. च्या खाली तपमान जाते अशा ठिकाणी मोटारींमध्ये हे वंगण वापरले जाते. बेरिलियम, तांबे , जस्त आणि चांदी यांचे लिथियम युक्त मिश्रधातू विविध क्षेत्रात मान्यता पावलेले आहेत.

सहसा आवर्त सारणीच्या डाव्या कोपऱ्यातील मूलद्रव्ये भूकवचात विपूल प्रमाणात आढळतात पण सोडियम , पोटॅशियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम आणि ऍल्युमिनियम या सगळ्यांपेक्षा लिथियम काहीसे दुर्मिळ आहे. या पदार्थाची किमान २० प्रकारची खनिजे निसर्गात सापडतात.

हेलियम

 हेलियम 


• नाव, चिन्ह, अणुक्रमांक- हेलियम, He, 2

दृश्यरू , परंगहीन वायू

रासायनिक श्रेणी निष्क्रीय वायू

• अणुभार- 4.002602ग्रॅ·मोल −१

• भौतिक गुणधर्म स्थिती- वायू

हेलियम हा एक रंगहीन, गंधहीन, चवरहीत, बिनविषारी, उदासीन वायू आहे. हेलियम हे २ अणूक्रमांकाचे रासायनिक मूलद्रव्य आहे.

हेलियमचा वितळण्याचा आणि वायूरूप होण्याचा बिंदु सर्व मूलद्रव्यात सर्वात कमी आहे. अतिशय पराकोटीच्या कमी तपमानाचा अपवाद सोडता हेलियम नेहेमी वायूरूपातच सापडतो.


हेलियमचा शोध ऑगस्ट १८ , इ.स. १८६८ रोजी सूर्याच्या क्रोमोस्फियरच्या लहरींचा पटलातील गडद पिवळ्या रेघेवरून लागला. हेलियमचे नामकरण हे ग्रीक भाषेतील ἥλιος (हेलियॉस ) अशा सूर्य ह्या अर्थी शब्दावरूनच करण्यात आले आहे.


• सिंधुदुर्गातील विजयदुर्ग-जसा शिवरायांच्या इतिहासाचा साक्षीदार, तसाच तो हेलियम वायूच्या शोधाचा साक्षीदार आहे. १८ ऑगस्ट १८६८ रोजी ब्रिटिश खगोलशास्त्रज्ञ सर नॉर्मन लॉकियर यांनी याच किल्ल्यावरुन, हेलियमचा शोध लावला होता . विजयदुर्गावर मुक्कामी असतांना, सूर्याभोवती असणा-या पिवळ्या रंगाच्या रेषा म्हणजेच हेलियम वायु असल्याचा शोध लॉकियर यांनी लावला. त्यामुळेच १८ ऑगस्ट हा 'हेलियम डे' म्हणून जगभरात साजरा केला जातो. हेलियमच्या जन्माचे ठिकाण म्हणून विजयदुर्गचे नाव जगभर प्रसिद्ध आहे.